सावर्डे येथे ३ जानेवारी रोजी साई भंडारा

विविध कार्यक्रमांचे आयोजन

मुरगूड ( शशी दरेकर ) : सावर्डे ( ता. कागल ) येथील श्री . साईबाबा मंदीराचा २१ वा वर्धापनदिनानिमित्त बुधवार दि .३ जानेवारी २०२४ रोजी साईभंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले असून त्या निमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत.

Advertisements

साई भंडाऱ्यानिमित्त बुधवार दि .३ जानेवारी रोजी सकाळी ५.३० वाजता श्रीं चा अभिषेक व महापूजा, सकाळी ६ वाजता महापूजा व आरती, ८ वाजता साईबाबांचा सामुदायिक जप,

Advertisements

९ वाजता सत्यनारायण महापूजा सकाळी ११ वाजता साईबाबांची महाआरती व महानैवेद्य अर्पण दुपारी १२ वाजता महाप्रसाद, सांयकाळी ७ वाजता महाआरती तर रात्री ९ वाजता बेलजाई महीला भजनी मंडळ उंदरवाडी यांचा भजनाचा कार्यक्रम असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

Advertisements

या साईभंडाऱ्याचा सर्वभक्तांनी लाभ घेण्याचे आवाहन पुजारी लक्ष्मण ग. निकम यांनी केले आहे.

AD1

Leave a Comment

error: Content is protected !!