कागल (विक्रांत कोरे): ग्राहक कल्याण फाऊंडेशन कोल्हापूर मार्फत पदाधिका-यांच्या विविध पदावर निवडी नुकत्याच जाहिर करण्यात आल्या. यावेळी कोल्हापूर जिल्हा प्रसिद्धीप्रमुखपदी दैनिक तरूण भारतचे व्हनाळी पत्रकार सागर मधुकर लोहार साके ता.कागल यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित ग्राहक कल्याण फाऊंडेशनच्या बैठकीत सदर निवडी करून निवडेचे पत्र ग्राहक फाऊंडेशनचे जिल्हा अध्यक्ष अरूण यादव यांचे हस्ते देण्यात आले.
यावेळी जिल्हा समिती उपाध्यक्ष भास्कर चंदनशिवे,जिल्हा सचिव तानाजी पाटील,कागल तालुका महिला समिती अध्यक्षा सौ.सुप्रिया गुदले,कागल तालुका अध्यक्ष बाबासाहेब चिकोडे, ,जिल्हा समिती महिला उपाध्यक्षा सौ.सुषमा पाटील आदी पदाधिका-यांच्या निवडी करण्यात आल्या. यावेळी सौ.स्नेहल पाटील, संजय बल्लाळ , सुनिल भरमकर,तालुका संजय कांबळे आदी पदाधिकारी उपस्थीत होते.