मार्कस कमी मिळाले म्हणून भीतीने गेली होती पळून
कागल (विक्रांत कोरे) : कागल मधून बेपत्ता झालेली शाळकरी मुले अपहरण नसून मार्क कमी पडले म्हणून घरातील माराच्या भीतीने त्यांनी केलेला तो बेबनाव होता. ती दोन्ही मुले सुखरूप पोलिसांना मिळाली. कागल पोलिसांकडून पालकांच्या ताब्यात त्यांना देण्यात आले.
कागल पोलीसातून मिळालेल्या माहितीनुसार, शिवांश सिंग वय वर्षे 15 राहणार ओमकार कॉम्प्लेक्स जयसिंग पार्क कागल, व वेदांत संतोष सोनार वय वर्षे 15 राहणार बेघर वसाहत कागल. ही दोन मुले कागल मधील खाजगी स्कूलमध्ये नववीच्या वर्गात शिकतात. नुकतीच यांची घटक चाचणी झाली होती. या चाचणीमध्ये त्यांना कमी गुण मिळाले होते. मिळालेले मार्ग कमी असल्याने हे घरात समजणार या भीतीपोटी त्यांनी शाळेतील तपासलेले पेपर चोरून काढून घेतले.
ही बाब शिक्षकांच्या लक्षात आल्यानंतर शिक्षकांनी घरच्यांना फोन करून दुसऱ्या दिवशी शाळेत पालकांना यायला पालकांना सांगितले. मुलांनी घरच्यांच्या माराच्या भीतीने दोघांनीही संगनमताने स्कूल जवळून तारीख 24 जुलै रोजी सायंकाळी सहा वाजता सायकल वरून राज्य महामार्गावरील लक्ष्मी टेकडी गाठली. सायकल तिथेच टाकून ते दोघेही बसने कोल्हापुरात रेल्वे स्टेशनवर गेले. पोलीस बघणार नाहीत असा आडोसा शोधून तेथेच रात्र काढली. तारीख 25 रोजी सकाळी संपूर्ण रंकाळा फिरून पाहिला व परत कोल्हापूर रेल्वे स्टेशनवर येऊन पोलीस बघणार नाहीत असा आडोसा शोधून तेथे ते दोघेही झोपले.
बुधवार तारीख सकाळ 26 रोजी सकाळी ते दोघेजण हायवे लगतच्या तावडे हॉटेल जवळ आले. या दोघांना एका इसमाने पाहिले. इसमाने ओळखल्यानंतर कागल पोलिसांना फोन केला. कागल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविकांत गच्चे ,सविता हजारे, विकास चव्हाण ,सुनील कांबळे ,यांनी त्यांना कागल पोलीस ठाण्यात आणले व त्यांच्या पालकांना बोलावून घेऊन त्यांना त्यांच्या ताब्यात दिले आणि या संशयीत अपहरण नाट्यावर पडदा पडला.