पत्रकार शिवाजी पाटील फाउंडेशनच्या वतीने आयोजित शिबिरात ३५० बांधकाम कामगारांची नोंदणी व आरोग्य तपासणी
गोरंबे, दि.३: गोरंबे ता. कागल येथे बांधकाम कामगार नोंदणीसह बांधकाम कामगारांची आरोग्य तपासणी शिबिर झाले. यामध्ये ३५० बांधकाम कामगारांची नोंदणी व आरोग्य विषयक विविध तपासण्या झाल्या. पत्रकार शिवाजी पाटील फाउंडेशनच्यावतीने या शिबिराचे आयोजन केले होते.
या शिबिरात पूर्ण शारीरिक तपासणी व त्यानुसार डॉक्टरांचा सल्ला, फुफ्फुस कार्यक्षमता चाचणी, कान तपासणी, डोळे तपासणी, संपूर्ण रक्तघटक तपासणी, रक्तातील साखर तपासणी, यकृत रक्तगणना चाचणी, किडनी कार्यक्षमता तपासणी, रक्तातील चरबी घटक तपासणी, मलेरिया चाचणी, लघवी तपासणी, ईएसआर, थायरॉईड तपासणी, रक्तातील हिमोग्लोबिन तपासणी, रक्तातील क्षार तपासणी, स्त्री स्तन कॅन्सर व गाठी तपासणी आदी सुविधा होत्या.
यावेळी सरपंच सौ. शोभा पाटील, शहाजी पाटील, शिवाजी विलास पाटील, शिवाजी हूरे- पाटील, संजय पाटील, अशोकराव पाटील, आप्पासाहेब सावंत, योगेश पाटील, दिलीप कांबळे, पिंटू गुरव आदी प्रमुख उपस्थित होते.
गोरंबे ता. कागल येथे पत्रकार शिवाजी पाटील फाउंडेशनच्या वतीने बांधकाम कामगार नोंदणीसह बांधकाम कामगारांच्या आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले होते.