सोमवारी होणार कागलमधील सरपंच पदाची आरक्षण सोडत

कोल्हापूर, दि. 16 : कागल तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या सन 2025 ते 2030 या कालावधीकरिता आरक्षण सोडत सोमवार, दिनांक 21 जुलै 2025 रोजी दुपारी 12.30 वाजता बहुउद्देशीय सभागृह, तहसीलदार कार्यालय, कागल येथे काढण्यात येणार आहे. इच्छुकांनी आरक्षणासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Advertisements

महाराष्ट्र ग्रामपंचायत (सरपंच आणि उपसरपंच) निवडणूक नियम 1964 (महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण क्र.23 दि.13 जून 2025) अन्वये 5 मार्च 2025 रोजीची अधिसूचना अधिक्रमित करून महाराष्ट्र शासनाद्वारे अधिसूचना राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून पुढील पाच वर्षांच्या कालावधीसाठी या अधिसूचनेद्वारे जिल्ह्यातील 1 हजार 26 ग्रामपंचायतींकरीता सरपंच पदापैकी विविध प्रवर्गांचे वाटप केले आहे.

Advertisements

कागल तालुक्यासाठी सरपंच पदासाठी आरक्षित करण्यात आलेला प्रवर्ग तपशील खालीलप्रमाणे आहे:

Advertisements
  • एकूण ग्रामपंचायती: 83
  • अनुसूचित जाती (महिलांसह): 6 (त्यापैकी 6 महिलांकरिता)
  • अनुसूचित जमाती (महिलांसह): 0 (त्यापैकी 0 महिलांकरिता)
  • नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिलांसह): 11 (त्यापैकी 11 महिलांकरिता)
  • सर्वसाधारण (महिलांसह): 25 (त्यापैकी 24 महिलांकरिता)

7 जुलै 2025 रोजीच्या मार्गदर्शन पत्रानुसार 5 मार्च 2025 रोजी प्रसिद्ध केलेली अधिसूचना अधिक्रमित करण्यात आली असल्याने 13 जून 2025 रोजीच्या अधिसूचनेनुसार सरपंच आरक्षणामध्ये कोणताही बदल होत नसला तरी नव्याने सरपंच आरक्षण सुनिश्चित करणे क्रमप्राप्त आहे. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधील कलम 30 व मुंबई ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम 1964 मधील नियम (3) (4) (4अ) (5) (6) अन्वये प्राप्त अधिकारानुसार महाराष्ट्र शासनाने दिनांक 13 जून 2025 अन्वये अधिसूचित केलेल्या आरक्षणानुसार जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये ग्रामपंचायतीसाठी सरपंच पदाचे आरक्षण प्रमाण निश्चित करण्यात आले आहे.

तालुकानिहाय निश्चित केलेल्या (बिगर अनुसूचित क्षेत्र) मधील ग्रामपंचायतींसाठी सरपंच पदाचे आरक्षण व महिला आरक्षण नव्याने निश्चित करणेकामी, सोडत पद्धतीने नमूद ठिकाणी काढणेकामी संबंधित तालुक्याच्या तहसीलदारांना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी प्राधिकृत केले आहे.

AD1

Leave a Comment

error: Content is protected !!