मुरगूड ( शशी दरेकर ): मुरगूड व मुरगूड परिसरात
” प्रजासत्ताक दिन ” मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. मुरगूड बाजारपेठेतील श्री. व्यापारी नागरी सह़. पतसंस्था येथे संस्थेचे चेअरमन श्री . किरण विठ्ठल गवाणकर यांच्या शुभहस्ते ” ध्वजारोहण ” करण्यात आले, मुरगूडच्या विजयमाला मंडलिक गर्ल्स हायस्कूलच्या विद्यार्थिनिनी मानवंदना दिली.
सदर ध्वजारोहण कार्यक्रमासाठी संस्थेच्या व्हा. चेअरमन सौं. रोहिणी तांबट, संचालक सर्वश्री किशोर पोतदार , प्रशांत शहा, हाजी धोंडिबा मकानदार, प्रदिप वेसणेकर, शशी दरेकर, प्रकाश सणगर, नामदेवराव पाटील, सातापा पाटील, संदिप कांबळे, यशवंत परीट, सुरेश जाधव, महादेव तांबट, सौं . संगिता नेसरीकर , कार्यलक्षी संचालक सुदर्शन हुंडेकर , कर्मचारी वर्ग उपस्थित होता.
याचबरोबर मुरगूडच्या ” हुतात्मा तुकाराम भारमल ” वाचनालय येथेही मा. श्री. पांडूरंग कृष्णा लाड ( सेवानिवृत सुभेदार ) यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले . यावेळी श्री. शिवाजीराव चौगले (सर), विलास सुर्यवंशी, किरण गवाणकर, आप्पासो कांबळे, दिग्विजय येरुडकर , शिवाजी गणपती चौगले, ‘वाचनालयाचे सभासद, वाचक , जेष्ठ नागरिक , कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुरगूड व मुरगूड परिसरात अनेक ठिकाणी ” प्रजासत्ताक दिन ” मोठ्या उत्साहात पार पडला.