कोल्हापूर, दि. 15 (जिमाका): माय भारत अंतर्गत “खेलो इंडिया टॅलेंट हंट” ही उदयोन्मुख खेळाडूंना त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी नव्याने निर्माण केलेली योजना आहे. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील विविध शाळा, महाविद्यालयांनी आपल्या विद्यार्थ्यांची नोंदणी https://mybharat.gov.in/khelolndia या पोर्टलवर दि. 20 फेब्रुवारी 2024 पर्यंत करावी, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी निलिमा अडसूळ यांनी केले आहे.
भारतीय क्रीडा क्षेत्रात विविध प्रतिभावंत युवा खेळाडूंचा शोध घेणे व त्यांच्या क्षमता विकसित करण्यासाठी खेलो इंडिया टॅलेंट हंट एक महत्वाचा उपक्रम आहे. केंद्र शासनाच्या युवा विकास व क्रीडा मंत्रालयाने सुरु केलेला हा कार्यक्रम तळागाळातील खेळाडूंच्या नैसर्गिक गुणवत्ता ओळखून त्यांना मार्गदर्शन देण्यासाठी व त्यांच्या क्षमतांचे प्रदर्शन करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यासाठी सुरु करण्यात आला आहे.
Your point of view caught my eye and was very interesting. Thanks. I have a question for you.
Thank you for your sharing. I am worried that I lack creative ideas. It is your article that makes me full of hope. Thank you. But, I have a question, can you help me?