कागल / प्रतिनिधी – कागल येथील अग्रगण्य असलेल्या राजे विक्रमसिंह घाटगे को ऑपरेटिव्ह बँकेस उत्कृष्ट नागरी सहकारी बँक हा पुरस्कार मिळालेला आहे. हा पुरस्कार पाचव्यांदा मिळालेला आहे. राज्य पातळीवरील पद्मभूषण वसंतदादा पाटील हा मानाचा पुरस्कार आहे. या पुरस्काराने बँकिंग क्षेत्रात राजे बँकेची शान-अन-मान उंचावलेली आहे. बँकेच्या इतिहासात झालेल्या नोंदीनुसार हा 22 वा पुरस्कार आहे. अशी माहिती बँकेचे अध्यक्ष एमपी पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

Advertisements

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असोसिएशन मुंबई यांनी ही पुरस्काराची घोषणा केली आहे.असे सांगत ते म्हणाले ,शनिवार तारीख 23 सप्टेंबर 2023 रोजी नाशिक येथे पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. राज्य बँक असोसिएशन मुंबईचे अध्यक्ष विश्वास ठाकूर उपाध्यक्ष वसंत भुई खेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Advertisements

राजे बँकेचे उपाध्यक्ष नंदकुमार माळकर, संचालक सर्वश्री राजेंद्र जाधव ,आप्पासो हुच्चे, आप्पासो भोसले, प्रकाश पाटील रवींद्र घोरपडे रणजीत पाटील, उमेश सावंत, सौ कल्पना घाटगे,सी ए अनिल मोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक चव्हाण, व्यवस्थापक हरिदास भोसले आदी यावेळी उपस्थित होते.

Advertisements
AD1
One thought on “राजे बँकेस मिळाला उत्कृष्ट नागरी सहकारी बँक पुरस्कार”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!