
मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता . कागल येथील श्री. गणेश नागरी सहकारी पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शामराव शिंदे यांची कागल तालुका सहकारी पतसंस्था संघाच्या संचालकपदी २०२५ ते ३० या कालावधीसाठी निवड झाली.
या निवडी कामी श्री . गणेश नागरी पतसंस्थेचे सर्व संचालक, सदाशिवराव बाईत (सर), चंद्रकांत गवळी, सम्राट सणगर यांचे मौलिक सहकार्य लाभले. या निवडीनंतर त्यांच्यावर विविध क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.