![](https://gahininathsamachar.com/wp-content/uploads/2021/10/IMG-20211005-WA0075.jpg)
साके(सागर लोहार): केनवडे ता.कागल येथील श्री अन्नपुर्णा शुगर अॅण्ड जॅगरी वर्क्स या कारखान्याच्या द्वितीय गळीत हंगाम शुभारंभ नुकताच मान्यवरांच्या उपस्थीत पार पडला आहे. कारखान्याच्या प्रत्यक्ष गळपासा आता सुरूवात झाली असून कार्यक्षेत्रातील सुमारे १७ गावात कारखान्याच्या ऊसतोडण्या सुरू करण्यात आल्या आहे. त्यानिमित्त कारखान्याला पाठवत असलेल्या ऊस ट्रॅक्टरचे गावोगावी पुजन करून कारखान्याला ऊस पाठविला जात आहे.
साके ता.कागल येथील अन्नपुर्णा शुगरच्या ऊस ट्रॅक्टरचे पुजन ज्ञानदेव पाटील, पा.व्ही.पाटील, किरण पाटील, चंदर निऊंगरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अन्नपुर्णा पाणी संस्थेचे संचालक अशोक पांडूरंग पाटील, सदस्य युवराज पाटील, सुजय घराळ, तानाजी चैागले, दगडू पोवार, साताप्पा आगळे, रंगराव पाटील, शेतकरी हनमंत चैागले, लहू पाटील तसेच संजयबाबा घाटगे गटाचे कार्यकर्ते शेतकरी उपस्थीत होते. यंदाच्या गळीत हंगामात अन्नपुर्णा शुगरला मोठ्या प्रमाणात ऊस पाठवून कारखान्याचे गाळप उद्धिष्ठ पुर्ण करण्याचे आवाहन किरण पाटील यांनी शेतक-यांना यावेळी बोलताना केले.