मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड येथील सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयात “समाजशास्त्र समजावून घेवूया ” या भित्तीपत्रिकेचे प्रकाशन नुकतेच संपन्न झाले.
मंडलिक महाविद्यालयात समाजशास्त्र आकलन व उपयोगिता असा आशय असलेले समाजशास्त्र समजावून घेवूया भित्तीपत्रिका तयार करण्यात आली आहे त्याचे प्रकाशन पत्रकार प्रा. सुनिल डेळेकर यांच्याहस्ते करण्यात आले. नॅक समन्वयिका प्रा. सौ माणिक पाटील प्रमुख उपस्थित होत्या.
याप्रसंगी बोलताना प्रा डेळेकर म्हणाले ‘ समाजाचे शास्त्र जाणून घेतल्यास सामाजिक उपयोगिता तयार होतात. विद्यार्थ्यांनी अशा भित्तीपत्रिकेच्या माध्यमातून ज्ञानात्मक बोध घ्यावा.
समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा . पांडुरंग सारंग यांनी स्वागत व प्रास्ताविक केले . सदर भित्तीपत्रिका लेखनासाठी कु साक्षी पोवार ,कु संध्या पाटील, कु श्रध्दा पाटील , कु पूजा माने , कु सानिका कांबळे , कु . सलोनी निलजकर ,कु .धनश्री बोटे, कु स्वाती मगदूम, कु सौम्या शेख, कु . शुभांगी ढोले व कु धनुजा बारड आदिंनी लेखन केले . त्यांना प्राचार्य डॉ शिवाजी होडगे व सर्व प्राध्यापकांचे मार्गर्शन व प्रोत्साहन मिळाले .
प्रा मनिषा पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर प्रा दिपाली सामंत यांनी आभार मानले .