जप्त स्थावर मालमत्तेचा जाहीर लिलाव सूचना

कोल्हापूर, दि. 17 (जिमाका): प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी क्र. 3 इचलकरंजी कोर्ट यांच्या आदेशानुसार, श्री. दिलीप अर्जुना काजळे, रा. 17/ब, ई वॉर्ड, 1 ली गल्ली, विक्रमनगर, ता. करवीर, जि. कोल्हापूर यांच्याकडून एकूण रक्कम रु. 17,19,572/- (रक्कम रुपये सतरा लाख एकोणीस हजार पाचशे बहात्तर फक्त) इतकी रक्कम वसूल करण्याकरिता त्यांची मौजे उंचगाव, ता. करवीर, जि. कोल्हापूर येथील गट नं. 378/6 पैकी त्यांच्या हिस्स्याचे क्षेत्र (0.00.38) व त्यावरील 644 चौ. फुटाचे आर.सी.सी. बांधकामाचा जाहीर लिलाव आयोजित करण्यात आला आहे.

Advertisements

हा लिलाव शुक्रवार, दिनांक 18 जुलै 2025 रोजी सकाळी 11 वाजता ग्राम महसूल अधिकारी कार्यालय, उंचगाव, ता. करवीर येथे संपन्न होईल. सदर माहिती करवीरचे तहसिलदार स्वप्नील रावडे यांनी दिली आहे.

Advertisements

लिलावाच्या अटी व शर्ती:

  1. मालमत्तेचे मूल्यांकन रु. 17,19,572/- (सतरा लाख एकोणीस हजार पाचशे बहात्तर फक्त) इतके असून, यापेक्षा कमी बोली स्वीकारली जाणार नाही.
  2. लिलाव मंजूर अंतरावर पूर्ण केला जाईल.
  3. ज्यांच्या नावे लिलाव पूर्ण होईल, त्याने एक चतुर्थांश (¼) रक्कम तात्काळ भरावयाची आहे.
  4. लिलाव मंजूर झाल्यानंतर, लिलाव धारक यांना समज दिल्यापासून तीन दिवसांत उर्वरित तीन चतुर्थांश (¾) रक्कम जमा करावयाची आहे.
  5. वरील अट क्र. 4 मधील पूर्तता न केल्यास फेरलिलाव केला जाईल आणि त्यात बोली कमी आल्यास अशी कमी पडणारी रक्कम पूर्वी जमा केलेल्या एक चतुर्थांश रकमेतून वजा केली जाईल.
  6. सक्षम अधिकाऱ्याकडून लिलाव मंजूर झाल्यानंतर विक्री प्रमाणपत्र दिले जाईल. त्या आधारे लिलाव धारकास मिळकतीचा प्रत्यक्ष ताबा देण्यात येईल.
AD1

Leave a Comment

error: Content is protected !!