कागल : विक्रांत कोरे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी कागल तालुका भाजपच्या वतीने नाना पटोलेंच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी पटोलेंविरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या अटकेची मागणी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत वारंवार आक्षेपार्ह विधान करणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे अशी जोरदार टीका भाजपचे मा प्रताप पाटील,व राजेन्द्र जाधव,यांनी केली.
यावेळी संजय पाटील बेळवडेकर, प्रताप पाटील, सुनील मगदूम, आसिफ मुल्ला, राजेंद्र जाधव, सतीश पाटील, दिलीप घाटगे, बाळासाहेब जाधव, मदारे सर, शिवगोंड पाटील, स्वप्निल शिंगाडे, संजय घाटगे, उमेश सावंत , महेश माने, वैभव गोरडे, मयुरेश बोतेआदी उपस्थित होते.