मुरगूड (शशी दरेकर) : दौलतवाडी ता . कागल येथिल शिक्षक व विद्यामंदीर करंजीवणे या शाळेचे मुख्याध्यापक श्री. जीवनराव जाधव यांचा दौलतवाडी येथे सेवानिवृत्तीबद्दल सपत्निक यथोचित सत्कार नुकताच संपन्न झाला.
जीवनराव जाधव यानीं नोकरीची सुरुवात सरोळी विद्यामंदीर गडहिंग्लज येथून ज्ञानदानाचे कार्य सुरू केले. त्यानंतर हळदी (ता . कागल ) व प्रमोशनानंतर वडगांव ( कापशी ) आणि नंतर मुख्याध्यापक म्हणुन करंजिवणे येथे अनेक विद्यार्थानां घडविण्याचे कार्य केले . त्याचबरोबर करंजीवणे येथिल शाळेला सुंदर शाळा बनवून जिल्ह्यात तृतिय स्थान प्राप्त करून ” आदर्श शाळा ” पुरस्कारचा बहुमान मिळवून दिला.
जीवनराव जाधव यानीं विद्यार्थ्यानां मार्गदर्शन व विद्यार्थाना संस्कारातून आणि अभ्यासातून गुणवत्ता विद्यार्थी घडविणारे मुख्याध्यापक म्हणून ते सर्वदूर परिचीत आहेत.
त्यांच्या सेवानिवृत्त सत्कारावेळी दौलतवाडीचे माजी सरंपच श्री. श्रीकांतराव भोसले यानीं त्यांच्या आतापर्यंतच्या ज्ञानदानाचे कौतूक करुन त्यांचा शाल , श्रीफळ , पुष्पगुच्छ व फेटा बांधून यथोचित सत्कार केला . यावेळी अनेक मान्यवरानी त्यांच्या ज्ञानदानाच्या कार्यपद्धतीबद्दल गौरव करुन मनोगत व्यक्त केली.
या सेवानिवृत्त सत्कारप्रसंगी केंद्र प्रमुख आनंदराव पाटील मळगे बु॥, मळगे विद्यामंदीर चे मुख्याध्यापक कोंडेकर सर, युवा फौंडेशनचे अध्यक्ष विरेंद्रसिंह भोसले, अनेक शिक्षक, पालक, ग्रामस्थ, महिला, विद्यार्थी व प्रमुख पाहुण्यांच्यासह नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.