मुरगूड ( शशी दरेकर ) – सेवानिवृत्तीनंतरची वेळ प्राचार्य बुगडे यांना समाजकार्यास वाहून घेण्यासाठी उपयोगी पडेल . त्यांनी सकारात्मक दृष्टिकोन बाळगून ज्येष्ठत्वाचे श्रेष्ठत्व निर्माण करावे असे प्रतिपादन जय शिवराज एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा .गजाननराव गंगापुरे यांनी व्यक्त केले . ते शिवराज विद्यालय ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य बी आर बुगडे यांचे सेवानिवृत्ती निमित्त आयोजित सत्कार शुभेच्छा समारंभ प्रसंगी अध्यक्षपदावरून बोलत होते.
प्राचार्य बी.आर. बुगडे यांचा मा. गंगापुरेसो यांचे हस्ते सपत्नीक सत्कार करणेत आला . विविध शाखा, संस्थांचे वतिने प्राचार्य बुगडे यांना यावेळी सन्मानीत करणेत आले. सत्काराला उत्तर देताना प्राचार्य बुगडे म्हणाले, स्व. सदाशिवराव मंडलिक साहेबांचे विश्वासास पात्र राहून प्राचार्य पदाचा कारभार सांभाळतांना खासदार संजयदादा मंडलिक यांचे मार्गदर्शन आणि ॲड. विरेंद्रभैय्या मंडलिक यांचे पाठबळाच्या जोरावर एक यशस्वी प्राचार्य म्हणून सेवानिवृत्त होत आहे .याचा सार्थ अभिमान वाटतो आहे.
हा कार्यक्रम गटशिक्षणाधिकारी जी.बी. कमळकर , मंडलिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अर्जुन कुंभार , एज्यु. संस्थेचे कार्यवाह आण्णासो थोरवत , शिवराजचे माजी प्राचार्य जीवन साळोखे , मुख्याध्यापक संघाचे चेअरमन सुरेश संकपाळ आदीमान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला .
यावेळी सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अर्जुन कुंभार, गटशिक्षणाधिकारी जी बी कमळकर, मुख्याध्यापक संघाचे चेअरमन सुरेश संकपाळ,जीवनराव साळोखे, प्रा.बी डी चौगुले, विकास बुगडे, विश्वजीत बुगडे, आदींनी मनोगते व्यक्त केली.
या कार्यक्रमास हमिदवाडा आयटीआयचे प्राचार्य अमोल वास्कर , टी एस गायकवाड , प्राचार्य एस आर पाटील , ज्येष्ठ विस्तार अधिकारी मा. गावडेसो, बी डी ढोले, रघुनाथ शेणवी, केंद्र शाळा यमगेचे केंद्रप्रमुख आ. ना. पाटील , बी.एल.दाभोळे , पी. डी. माने, एम. आय. कांबळे, श्रीमती एस बी पाटील, वाय बी सुर्यवंशी, संपत कळके, एस एन आंगज , एस पी कांबळे, विजय भोसले , आदी उपास्थित होते.
स्वागत प्रास्ताविक उपप्राचार्य रविंद्र शिंदे , सूत्रसंचालन अविनाश चौगले तर आभार उपमुख्याध्यापक डी बी पाटील यांनी मानले .