माने महाविद्यालय येथे शिवजयंती निमित्ताने भितीपत्रिका सादरीकरण

कागल (विक्रांत कोरे) : डी. आर. माने महाविद्यालय कागल येथे शिवजयंती निमित्ताने इतिहास विभागाच्या वतीने भितीपत्रिका सादरीकरण स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते.   

Advertisements

         विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज व शिवकाळ या विषयास अनुसरून भितीपत्रिका सादरीकरण स्पर्धा हा एक वेगळ्या स्वरूपाचा कार्यक्रम घेण्यात आला. या स्पर्धेमधून विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या नवीन संकल्पना त्यांचे सादरीकरण यासाठी इतिहास विभागांमकडून प्रोस्ताहन देणार आले. विद्यार्थ्यांनी शिवचरित्राचा एकेक संकल्पना सादर केली. या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.

Advertisements

            स्पर्धेचे उद्घाटन प्राचार्य डॉ. नंदकुमार कदम यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून केले. स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रा.संदीप वाडिकर व प्रा. राजेंद्र मोगणे यांनी काम पाहिले. या स्पर्धेमध्ये सहभागी विद्यार्थ्यांपैकी पुढील प्रमाणे नंबर देण्यात आले. सुरज कुराडे – प्रथम क्रमांक, हिंदवी कुंभार व सानिका कांबळे – द्वितीय क्रमांक,समृद्धी चंद्रकांत पाटील- तृतीय व माधुरी विजय चव्हाण व समृद्धी हेमंत पाटील- उत्तेजनार्थ या विद्यार्थ्यांना देण्यात आले.

Advertisements

स्पर्धेचे आयोजन इतिहास विभाग प्रमुख डॉ. संतोष जेठिथोर यांनी केली होते. स्पर्धेसाठी डॉ. रणजित पाटील व प्रा. विश्वजीत खाडे यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु. चंद्रकला व्हटकर व गायत्री पाटील यांनी केले तर आभार कु. सानिका पाटील यांनी मानले.

AD1

1 thought on “माने महाविद्यालय येथे शिवजयंती निमित्ताने भितीपत्रिका सादरीकरण”

Leave a Comment

error: Content is protected !!