मुरगूडमध्ये नगरपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने पोलिसांचे संचलन

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड शहरात नगरपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने कुठलाही अनुचित प्रकार घडू नये व कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी शनिवार दि. २९/११/२०२५ रोजी १०.१५ ते ११.२० दरम्यान मुरगूड पोलिसानी सपोनि शिवाजी करे यांच्या नेतृत्वाखाली संचलन काढण्यात आले.

Advertisements

यावेळी संचलन पोलिस स्टेशनपासून एस.टी. स्टँड परिसरात आले नंतर या ठिकाणी दंगल काबू योजनांची रंगीत तालीम घेण्यात आली. या प्रात्यक्षिकानंतर तुकाराम चौक, जमादार चौक, अंबाबाई मंदीर, पाटील कॉलनी, शिवतीर्थ, मुरगूड नाका येथून मुरगूड बाजारपेठ येथुन कबरस्थान मशिद परत पोलिस स्टेशन मार्गक्रमण करत समारोप करण्यात आला.

Advertisements

या संचलनात मुरगूड पोलिस स्टेशनचे १ अधिकारी, २५ पोलिस अमलदार, करवीर पोलिस ठाणेकडील २ अमलदार, व २० होमगार्ड सहभागी झाले होते.

        तसेच मुरगूड ग्रामिण रुग्णालय कडील वैद्यकीय अधिकारी यांच्यासह अँम्बुलन्स पथक, मुरगूड नगरपरिषद कार्यालयाकडील अग्नीशामक दल पथक सहभागी झाले होते. यावेळी सर्व अधिकारी, पोलीस अमलदार उपस्थितानां रंगीत तालमीचा आशय व उद्देश समजावून सांगून नगरपरिषद निवडणूक शांततेत पार पाडावी असे आवाहन करण्यात आले.

Advertisements
AD1

Leave a Comment

error: Content is protected !!