व्हनाळी(वार्ताहर) : वृक्षारोपण आणि संगोपण हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. कारण वृक्ष ही सजीवांचेश्वसन स्त्रोत आहेत. म्हणूनच वृक्षांचे रोपण आणि संवर्धन म्हणजेच पर्यावरणाचे रक्षण हे प्रत्येकाचं कर्तव्य बनल्याचे प्रतिपादन राजेश्री बहेनजी यांनी केले.
केंबळी तालुका कागल येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय शाखा केंबळी यांच्या वतीने आयोजित केलेल्या वृक्षारोपण कार्यक्रम प्रसंगी त्या बोलत होत्या.
राजश्री बहेनजी पुढे म्हणाल्या पिकावरील किटकनाशक फवारणी, बेसुमार वृक्षतोड व उत्खनन यामुळे निसर्गाचा समतोल ढळत चालला असून अतिवृष्टी महापूर यामुळे अनेक साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने मानवाचे जगणे मुश्कील होवून बसले आहे.या मुळे निसर्गाचा समतोल ढळत चालल्यामुळे पर्यावरणाचा धोका वाढत चालला आहे. तेव्हा सजीव आणि पर्यावरणाचे रक्षण होण्या साठी प्रत्येकाने वृक्षारोपण आणि वृक्ष संगोपन केले पाहिजे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
यावेळी बाळासाहेब कातकर सुभाष भाई,पिंटू जांभळे,एन.एस.पाटील, विठ्ठल पाटील, अविनाश पाटील यांच्या हस्ते चिक्कू, सीताफळ, रामफळ आंबा ,पेरू, लिंबू आदी बळ झाडांच्या रोपांचे रोपं करण्यात आले. या वेळीयोगिता बहेनजी, प्रियांका बहेनजी, नंदा पाटील ,अपर्णा पाटील , अरुणा पाटील ,मंगला कातकर आदी मान्यवर उपस्थित होते.
2 thoughts on “वृक्षारोपण आणि संगोपन हे प्रत्येकाचे कर्तव्य होय – राजेश्री बहेनजी”