पिंपळगाव खुर्द : पिंपळगाव खुर्द तालुका कागल येथील तलावा शेजारी असणाऱ्या मैदानामध्ये सध्या मध्यप्रेमींचा अड्डा बनलेला आहे. संध्याकाळी सात नंतर या ठिकाणी अनेक मध्यप्रेमी मध्य प्राशन करण्यासाठी येतात.सध्या हे मैदान मध्ये प्रेमीचा अड्डा बनत चालेल आहे.
पिंपळगाव खुर्द येथील कागल मुरगुड रोड लगत असणारा माळावर सध्या मोठ्या प्रमाणावरती तळीराम दिसून येत आहेत. तलावा शेजारीच असणारा मोकळा माळ हा सध्या तळीरामाचा अड्डा बनलेला आहे .या ठिकाणी संध्याकाळी सात नंतर मोठ्या प्रमाणावरती मद्यपान करण्यासाठी मध्यप्रेमी उपस्थित असतात. मध्य प्राशन केल्यानंतर असणाऱ्या बाटल्या या ठिकाणी टाकून जातात तर काही जण बाटल्या फोडून त्याच्या काचा शेजारी असणाऱ्या ग्राउंड वरती फेकत आहेत.या फुटलेल्या बाटलीच्या कांचामुळे अनेक जणांना दुखापत होत आहे.याकडे कोणी लक्ष देणारे आहे की नाही असा प्रश्न पुढे येत आहे.
शेजारीच तलाव आणि त्याच्या बाजूला असणाऱ्या ग्राउंड असे निसर्गरम्य वातावरण या ठिकाणी असल्यामुळे आसपास असणाऱ्या गावातील अनेक मध्य प्रेमींना सध्या या ठिकाणच्या जागेची भुरळ पडत आहे. त्यामुळे मध्यप्रेमी सध्या पिंपळगावच्या या माळावरती पिण्यासाठी दाखल होत आहेत. स्थानिक लोकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.शेजारी असणाऱ्या ग्राउंड वरती बाटल्या व काचा मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत.
संध्याकाळी सात नंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मध्य प्रेमींची वर्दळ वाढल्यामुळे स्थानिक लोकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याकडे स्थानिक प्रशासनाने आणि पोलीस प्रशासनाने देखील लक्ष देऊन या मध्य प्रेमींना धडा शिकवण्याची गरज आहे.
Good post! We will be linking to this particularly great post on our site. Keep up the great writing