कोल्हापूर, दि. 3 : निवृत्तीवेतनधारकांनी बँकेतील हयातीच्या दाखल्यांच्या यादीतील नावासमोर स्वाक्षरी करावी, असे आवाहन प्रभारी जिल्हा कोषागार अधिकारी मानसी आमते यांनी केले आहे.
निवृत्तीवेतनधारकांनी दिनांक 1 नोव्हेंबर रोजी हयात असल्याबाबत निवृत्तीवेतन घेत असलेल्या बँकेत नावासमोर स्वाक्षरी करावी. या यादीत आपले पॅन कार्ड, आधार कार्ड व मोबाईल क्रमांक बरोबर असल्याची खात्री करावी.
निवृत्तीवतनधारक, कुटूंब निवृत्तीवेतनधारक यांनी पुन:श्च शासनामध्ये कोणत्याही प्राधिकरणात सेवा स्वीकारली नाही, पुर्नविवाह केलेला नाही याबाबतची माहिती बँकेकडे सादर करावी, अन्यथा माहे डिसेंबर 2022 चे निवृत्तीवेतन अदा करण्यात येणार नाही, असेही श्रीमती आमते यांनी कळविले आहे.