दिनांक 24 ऑगस्ट रोजी होणार सुरू

कागल : कागल नगरपरिषद कागल जिल्हा कोल्हापूर मार्फत जाहीर आवाहन करण्यात आले आहे नगरपरिषद मालकीचे आकर्षक पाझर तलाव म्युझिकल फाउंटन, पादचारी मार्ग धबधबा येथे पर्यटकांचे उत्स्फूर्त प्रतिसाद व वाढत्या ओघामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाची कामे सोमवार दिनांक 19-8-2024 ते शुक्रवार दिनांक 23-8-2024 करण्यात येणार आहेत.

तरी सर्व पर्यटकांसाठी सोमवार दिनांक 19-8-2024 ते शुक्रवार दिनांक 23-8-2024 पर्यंत पाझर तलाव म्युझिकल फाउंटन, पादचारी मार्ग व कृत्रिम धबधबा पर्यटकांचे सुरक्षितते कामी बंद करण्यात येणार आहे याची नोंद घ्यावी.

शनिवार दिनांक 24-8-2024 पासून आकर्षक पाझर तलाव म्युझिकल फाउंटन, पादचारी मार्ग व कृत्रिम धबधबा पर्यटकांसाठी पूर्ववत खुले करण्यात येईल याची नोंद घ्यावी व कागल नगरपरिषद प्रशासनास सहकार्य करावे ही विनंती
मुख्याधिकारी तथा प्रशासक अजय पाटणकर यांनी केली.

12 thoughts on “पाझर तलाव धबधबा आज पासुन चार दिवस राहणार बंद”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!