८१ व्या वाढदिवसानिमित्त कागल तालुका राष्ट्रवादीतर्फे परिवार संवाद कार्यकर्ता शिबिर संपन्न
८१ ज्येष्ठ नागरिकांचा श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानपत्राने गौरव
कागल : देशाचे नेते व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार साहेबांनी हयातभर समाजकारणाला पाठबळ दिले, असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी केले. सर्वच जाती -धर्मांना सोबत घेऊन सामाजिक सलोख्यातून शांतता या तत्वावर ते आयुष्यभर चालत राहिले, असेही ते म्हणाले.
श्री. पवार यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त कागल तालुका राष्ट्रवादीतर्फे कागलमध्ये आयोजित परिवार संवाद कार्यकर्ता शिबिरात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ जिल्हा परिषद सदस्य युवराज पाटील होते. कार्यक्रमात केक कापून ८१ ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते झाला. तसेच, मुंबईवरून लाईव्ह झालेल्या श्री. पवार यांच्या वाढदिवस कार्यक्रमालाही नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.
केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने म्हणाले, सबंध देशभर शरद पवारसाहेबांची ओळख बहुजनांचा नेता अशी आहे. त्यांनी सातत्याने महाराष्ट्रासह देशाला पुढे नेण्याचा विचार केला.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य युवराज पाटील, केडीसीसी बँक संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, गोकुळ संचालक नवीद मुश्रीफ, कागलच्या नगराध्यक्षा सौ. माणिक रमेश माळी, उपनगराध्यक्ष विवेक लोटे, कागल तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष विकास पाटील, रमेश माळी, नगरसेवक प्रवीण काळबर, नगरसेवक बाबासाहेब नाईक, नगरसेवक सौरभ पाटील, नगरसेवक आनंदा पसारे, नगरसेवक सतीश गाडीवड्ड, नगरसेविका सौ. अलका मर्दाने, नगरसेविका बरकाळे वहीनी, नगरसेविका शोभा लाड, कागल शहर अध्यक्ष संजय चितारी, कृष्णात पाटील, माजी नगराध्यक्ष अजित कांबळे, जयदीप पोवार, दत्ता पाटील, शिवानंद माळी, दिनकर कोतेकर, पंकज खलीफ, नवाज मुश्रीफ, अस्लम मुजावर, इरफान मुजावर, गणेश सोनुले, बच्चन कांबळे, सौ. पद्मजा भालबर, सौ. वर्षा बन्ने, गंगाराम शेवडे, संजय ठाणेकर, संजय फराकटे, जावेद नाईक, सुनिल माळी, सुनिल माने, अमर सणगर आदी प्रमुखांसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित होते.