कागल : कागल शहरामध्ये १९५७ साली स्थापन झालेल्या पंडीत जवाहरलाल नेहरू उर्दु मराठी शाळेला आजतागायत ६७ वर्षापासून जागा मिळालेली नाही. त्यासाठी नगरपरिषदेने गट नंबर ३८५ पैकी १० गुंठे जागा इमारत व पठांगण साठी मिळावी या करिता ब-याच वर्षापासून मुस्लीम बांधवांनी मागणी केली आहे व कागल मुस्लीम कब्रस्थान येथील आमच्या समाजाची दिड एकर जागेवर नगरपरिषदेने अनाधिकृत टाकलेले आरक्षण त्वरीत मागे घ्यावे या करिता कागल नगरपरिषद कार्यालयासमोर सर्व समाजातर्फे लाक्षणिक उपोषण सुरू करणेत आले.
यावेळी उपोषणास मुस्लीम जमियत चे संचालक व उर्दु मराठी शाळा व कब्रस्थान बचाव समितीचे अध्यक्ष समीर नायकवडी हाजी यासीन आलासकर बाळासो नाईक, हाजी दस्तगिर नदाफ, हिदायत नायकवडी, असिफ मुल्ला, करनूर चे मिरासाब शेख, राजु शानेदिवाण, सचिन निंबाळकर, सुशांत कालेकर, प्रविण काळबर, विवेक लोटे, सलाउद्दीन सय्यद, इंद्रजित घाटगे, (अध्यक्ष शिवराज्य मंच, कागल), अशोक शिरोळे (अध्यक्ष वनमित्र संस्था), विजय इंगवले (अध्यक्ष कागल ता. बिबियाणे असो.),अंजुमन खान, ऍडकेट. महादेव गोरडे, प्रकाश माळी, धीरज राऊत, दिलीप कांबळे, जावेद मकानदार, यासिन नायकवडी, बाळासो हेगडे, इजाज अहमद सरखवास, वसीम नायकवडी, मोहसीन पिरजादे, उमेश सावंत, सागर कोंडेकर उपस्थित होते.