पालिकेचा भोंगळ कारभार! जाहिरातीविनाच उरकली घरफाळा सुनावणी; नागरिकांचा तीव्र संताप

स्थानिक वृत्तपत्रांत प्रसिद्धीपत्रक न दिल्याने नागरिकांमध्ये तीव्र असंतोष

कागल (प्रतिनिधी): कागल नगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेल्या २५ टक्के घरफाळा वाढीच्या विरोधात दाखल झालेल्या हरकतींवर सुनावणी सुरू झाली आहे. घरफाळा वाढीच्या विरोधात शहरात आधीपासूनच मोठा सूर उमटला होता. विविध राजकीय पक्ष व संघटनांनी नगरपालिकेत येऊन तीव्र विरोध दर्शवला होता, तर सत्ताधारी गटानेही आपण जनतेसोबतच असल्याचे जाहीर केले होते.

Advertisements

नगरपालिकेने या महत्त्वपूर्ण सुनावणीची पूर्वसूचना स्थानिक वृत्तपत्रांमध्ये जाहिरातीद्वारे योग्य रीतीने प्रसिद्ध केली नसल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केला आहे. वृत्तपत्रांत जाहिरात न दिल्याने:

माहितीचा अभाव: प्रभागांमधील हजारो मिळकतधारकांपर्यंत सुनावणीची तारीख व वेळेची योग्य माहिती पोहोचू शकली नाही.

Advertisements

८४४ हरकतदारांपैकी केवळ चारशेच्या आसपास नागरिकच सुनावणीस उपस्थित राहू शकले. बहुतांश नागरिक माहितीअभावी या प्रक्रियेपासून वंचित राहिले.

नागरिकांचा संताप: पालिकेने पारदर्शक व्यवहार न करता सुनावणी गुंडाळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत उपस्थित नागरिकांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली.

मंगळवारी प्रभाग ‘ए’ व ‘बी’मधील ३,७०० मिळकतधारकांपैकी ८४४ जणांनी घरफाळा वाढीस रितसर हरकती नोंदविल्या होत्या. उपस्थित नागरिकांनी घरफाळ्याचे मूल्यमापन चुकीचे झाल्याचे पुरावे सादर करत करवाढीस विरोध दर्शवला. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांची उपस्थिती उल्लेखनीय होती.

Advertisements

ही सुनावणी प्रादेशिक मूल्यांकन अधिकारी संदेश कुळवमोडे, नगरपालिका कर निरीक्षक प्रकाश पाटील, अभियंता परवेझ मुल्लाणी आणि मयुरी जाधव यांच्या उपस्थितीत पार पडली. सदर सुनावणी गुरुवारपर्यंत सुरू राहणार आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!