कागल शासकीय विश्रामगृहाजवळ स्विफ्टचा अपघात, एक किरकोळ जखमी

कागल (सलीम शेख ) : पुणे-दौंडहून गोव्याला पर्यटनासाठी गेलेल्या तीन जणांच्या स्विफ्ट गाडीला काल पहाटे कागल शासकीय विश्रामगृहाजवळील तीव्र वळणावर अपघात झाला. चालकाचा ताबा सुटल्याने ही दुर्घटना घडली. सुदैवाने गाडीतील एअरबॅग वेळेत उघडल्याने मोठी हानी टळली असून, एकजण किरकोळ जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-दौंड येथील तीन मित्र गोव्याला पर्यटनासाठी गेले होते. रात्री ते पुण्याला … Read more

मुंबईच्या रक्षणासाठी सज्ज ! सरकार, संरक्षण दल एकत्र

मुंबई: शत्रूच्या कोणत्याही कारवाईला सडेतोड उत्तर देण्यासाठी मुंबई सज्ज झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली संरक्षण दल आणि राज्य सरकारने सुरक्षेचा आढावा घेतला. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशानंतर, मुंबईच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत, गुप्तचर यंत्रणा अधिक सक्षम करण्याचे निर्देश देण्यात आले. मुंबईच्या रक्षणासाठी राज्य सरकार आणि संरक्षण दल एकदिलाने काम करतील, असा निर्धार व्यक्त करण्यात आला. … Read more

आंबुबाई पाटील इंग्लिश मीडियम हायस्कूल अँड कॉलेजचे दहावीच्या परीक्षेत उत्कृष्ट यश; 100% निकाल!

गोकुळ शिरगाव (सलीम शेख): सौ. आंबुबाई पाटील इंग्लिश मीडियम हायस्कूल अँड कॉलेजने इयत्ता दहावीच्या परीक्षेत यावर्षीही १००% यश मिळाले .शाळेतील सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, शंभर टक्के निकाल लागला आहे. शाळेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि विद्यार्थ्यांच्या कठोर परिश्रमाचे हे उत्तम उदाहरण आहे. या परीक्षेत ओम श्रीकांत पाटील याने ९५.८०% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर, … Read more

आडी येथे परमपूज्य परमात्मराज महाराजांचे भक्तिमार्गावर मार्गदर्शन; हजारो भाविकांचा लाभ

आडी (राजकुमार पाटील) : नामस्मरण, पूजाअर्चा आणि सद्ग्रंथांचे वाचन यांसारख्या चांगल्या सवयी अंगीकारून भक्तिमार्गाची सवय जडवावी, असे प्रतिपादन परमपूज्य परमात्मराज महाराज यांनी केले. ते आडी येथील संजीवनगिरीतील श्रीदत्त देवस्थान मठाच्या वतीने वैशाख पौर्णिमेनिमित्त सर्वेज्य सांस्कृतिक भवनात आयोजित प्रवचन कार्यक्रमात बोलत होते. यावेळी सकाळी श्रीदत्त मंदिरात दत्तगुरूंच्या चरणचिन्हांवर अभिषेक करण्यात आला, त्यानंतर महाआरती झाली. रात्री साडेसात … Read more

उजळाईवाडी-तामगाव रस्त्यासाठी ग्रामस्थांचे जनआंदोलन; विमानतळावर ठिय्या, लोकप्रतिनिधींची मध्यस्थी

गोकुळ शिरगाव (सलीम शेख ) : उजळाईवाडी ते तामगाव हा रस्ता पूर्ववत सुरू करावा किंवा तातडीने पर्यायी मार्ग उपलब्ध करून द्यावा, या मागणीसाठी आज तामगावमधील ग्रामस्थांनी तीव्र आंदोलन छेडले. ग्रामस्थांनी गावात निषेध फेरी काढत सर्व व्यवहार बंद पाडले. त्यानंतर आक्रमक ग्रामस्थांनी थेट विमानतळावर धडक मारून जोरदार निदर्शने केली आणि उन्हात ठिय्या आंदोलन केले. भारत-पाकिस्तानमधील तणावपूर्ण … Read more

दहावी परीक्षेचा निकाल उद्या दुपारी 1 वाजता जाहीर होणार!

मुंबई: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा (2025) निकाल उद्या, दुपारी 1 वाजता जाहीर होणार आहे. विद्यार्थी मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर (www.mahresult.nic.in) आपला निकाल पाहू शकतात. यंदाच्या परीक्षेत राज्यातील लाखो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. निकालाची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. विद्यार्थी आणि पालक निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. निकाल पाहण्यासाठी: * महाराष्ट्र … Read more

कोल्हापूरमध्ये PETA इंडियाच्या तक्रारीनंतर दोन बेकायदेशीर घोड्यांच्या शर्यती आणि एका मेंढ्यांच्या झुंजीचा कार्यक्रम थांबवला

कोल्हापूर – करवीर तालुक्यातील डोणवडे येथे ८ मे रोजी होणाऱ्या बेकायदेशीर मेंढ्यांच्या झुंजीच्या कार्यक्रमाची आणि गडहिंग्लज तालुक्यातील भाडगाव येथे ८ आणि १० मे रोजी होणाऱ्या अनधिकृत घोडा आणि घोडागाडी शर्यतींची पोस्टर्स मिळाल्यानंतर, पीपल फॉर एथीकल ट्रीटमेंट ऑफ अॅनिमल्स (PETA) इंडियाने त्वरित आणि यशस्वीरित्या कोल्हापूर पोलिसांना माहिती देऊन आणि त्यांच्या सहकार्याने हे बेकायदेशीर कार्यक्रम थांबवले. पोलिसांनी … Read more

कागल तालुका बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी आनंदराव पाटील यांची निवड

कागल : येथील तालुका वकील संघटनेच्या नूतन कार्यकारिणीची निवड खेळीमेळीच्या व शांततेच्या वातावरणात पार पडली. अध्यक्षपदी अँड. आनंदराव पाटील, उपाध्यक्षपदी अँड. बजरंग म्हसवेकर, सचिवपदी अँड. अभिजित सांगावकर, सहसचिवपदी अँड. मीनाक्षी जाधव आणि महिला प्रतिनिधी म्हणून अँड. कांचन खंदाळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडप्रसंगी कागल वकील संघटनेचे सिनिअर व जुनिअर वकील उपस्थित होते. मावळते अध्यक्ष … Read more

वाचा गहिनीनाथ समाचार अंक ३५ ऑनलाईन

गहिनीनाथ समाचार अंक ३५ दिनांक १२-०५-२०२५ रौप्यमहोत्सवी गहिनीनाथ समाचार गेली २५ वर्ष अखंडित दर सोमवारी प्रकाशित होत असून गेले २१ वर्ष शासनमान्य जाहिरात यादीवर आहे. देशातील घडामोडी तसेच परिसरातील घटना निर्भीडपणे मांडण्याचा आमचा प्रयत्न असतो. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, राजकारण, अंधश्रद्धा, शेती, युवकांच्या समस्या अशा अनेक प्रश्नावर ‘गहिनीनाथ समाचार’ मध्ये लिहिले जाते. प्रबोधनात्मक अनेक लेखावर चांगल्या … Read more

नेर्ली-तामगाव-उजळाईवाडी रस्ता वाहतुकीसाठी बंद, विमानतळ सुरक्षा धोक्यात कारण

गोकुळ शिरगाव (सलीम शेख ) : कोल्हापूर विमानतळाच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव नेर्ली-तामगाव-उजळाईवाडी हा महत्त्वाचा रस्ता शनिवार मध्यरात्रीपासून वाहतुकीसाठी कायमस्वरूपी बंद करण्यात आला आहे. देशातील सध्याची युद्धजन्य परिस्थिती आणि विमानतळाला असलेला हाय अलर्ट यामुळे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी हा निर्णय घेतला आहे. कोल्हापूर विमानतळाच्या धावपट्टीच्या अगदी बाजूने हा रस्ता जात असल्याने विमान वाहतुकीसाठी तो धोकादायक ठरत होता. … Read more

error: Content is protected !!