दुधगंगा वेदगंगा साखर कारखान्यात इथेनॉल प्रकल्पाचे उद्घाटन

शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य, देशाला परकीय चलन बचत! कोल्हापूर, दि. २३ : बिद्री येथील दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्यात (मौनीनगर) उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक इथेनॉल निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात पार पडले. फित कापून आणि कोनशिलेचे अनावरण करून हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राष्ट्राला समर्पित … Read more

सरपिराजीराव तलावाच्या सांडव्या वरती पुल व्हावा या मागणीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुरगूड शहरवासीयांतर्फे निवेदन

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता. कागल येथिल विश्वनाथराव पाटील मुरगूड सहकारी बँकेच्या अमृतमहोत्सव कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. हा कार्यक्रम सपन्न झाल्यानंतर सरपिराजी तलावाच्या सांडव्याच्या पाण्यावर पूल व्हावा या मागणीचे निवेदन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यानां मुरगूडवाशियातर्फै देण्यात आले. मुरगुड शहराच्या पूर्व बाजूस सर पिराजीराव तलाव हा शंभर वर्ष पूर्ण झालेल्या तलाव … Read more

बनावट जन्म प्रमाणपत्रांना चाप लागणार; ‘एसओपी’ची अंमलबजावणी सुरू

महसूलमंत्र्यांकडून जन्म नोंदणी प्रक्रियेत पारदर्शकता; रद्द प्रमाणपत्रे परत घेणार अखेर जन्म नोंदणी प्रमाणपत्र देण्यासाठी ‘एसओपी’ (प्रमाणित कार्य पद्धती) लागू होणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासंबंधीचे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे आता जन्म प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया अधिक सुटसुटीत आणि पारदर्शक होईल अशी अपेक्षा आहे. रद्द झालेली प्रमाणपत्रे परत जमा करण्याची सूचना मंत्रालयात झालेल्या बैठकीत, … Read more

परदेशी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची मुदतवाढ: ६ जून २०२५ पर्यंत संधी!

पुणे : महाराष्ट्रातील विमुक्त जाती व भटक्या जमाती (विजाभज), इतर मागास वर्ग (इमाव) आणि विशेष मागास प्रवर्ग (विमाप्र) मधील विद्यार्थ्यांसाठी परदेशात शिक्षण घेण्याचे स्वप्न आता आणखी जवळ आले आहे! परदेश शिक्षण शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत १७ मे २०२५ होती, ती आता वाढवून ६ जून २०२५ पर्यंत करण्यात आली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी या … Read more

गोकुळ शिरगावजवळ गाय वाहतूक करणाऱ्या टेम्पोचा अपघात; चालक जखमी

गोकुळ शिरगाव (सलीम शेख): गोकुळ शिरगाव येथील साई प्रसाद हॉटेलजवळ पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास गायींची वाहतूक करणाऱ्या एका आयशर टेम्पोला अपघात झाला. या अपघातात टेम्पो चालक किरकोळ जखमी झाला असून, वाहनातील काही गायींनाही दुखापत झाली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, एमएच ०९ बीसी ०४०३ क्रमांकाचा टेम्पो चालक अभिजित आप्पासो पाटील (वय ३२, … Read more

जागतिक जैव विविधता दिवस

पृथ्वी वरील सर्व सजीव सृष्टी एकमेकांवर अवलंबून आहे. कोणत्या ना कोणत्या कारणांसाठी त्यांना एकमेकांवर अवलंबून रहावे लागते त्या नुसार सजीवांच्या अन्न साखळ्या निर्मान झाल्या आहेत. पृथ्वी च्या सजीव सृष्टी च्या इतिहासात मानवाचा प्रवेश हा सर्वात शेवटी मानला जातो. जसे झाडांना त्यांचे परागीभवन, बियांचे वहन करण्यासाठी कीटक, पक्षी, प्राणी, वारा, पाणी यांची आवशकता असते आणि हे … Read more

कागलमध्ये लाखोंचा ऐवज लंपास, चोरट्यांचे पोलिसांसमोर आव्हान

कागल (विशेष प्रतिनिधी): कागल तालुक्यातील कसबा सांगाव येथील वाकी वसाहतीत एका बंद घराला लक्ष्य करत अज्ञात चोरट्याने सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा तब्बल ११ लाख ३१ हजार ४४५ रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. गुरुनाथ बाळू पाटील यांच्या घरी झालेल्या या चोरीमुळे कागल पोलिसांसमोर चोरट्यांना पकडण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. मिळालेल्या … Read more

निधन वार्ता – श्रीमती शेवंताबाई मारूतराव सुर्यवंशी-पाटील

श्रीमती शेवंताबाई मारूतराव सुर्यवंशी-पाटील मुरगूङ याचे वार्धक्याने दिनांक २१.५ .२०२५ रोजी रात्री १० वाजता दुःखद निधन झाले. मुरगूड येथिल शिवगड अध्यात्मिक ट्रस्टचे खजिनदार व इंजिनिअर बाळासाहेब सुर्यवंशी यांच्या त्या मातोश्री होत. त्यांचे पश्र्चात दोन मुले,दोन मुली नातवंडे सुना असा परिवार आहे,रक्षा विसर्जन रविवारी सकाळी ९ वा आहे.

शिष्यवृत्ती लाभार्थी संख्येत वाढीसाठी प्रस्ताव सादर करण्याचे शालेय शिक्षण मंत्र्यांचे निर्देश

मुंबई, दि. २१: शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी शिष्यवृत्तीच्या संख्येत वाढ करण्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. अनेक वर्षांपासून शिष्यवृत्तीच्या संच संख्येत कोणतीही वाढ किंवा बदल झालेला नाही, त्यामुळे गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांपर्यंत शिष्यवृत्तीचा लाभ पोहोचवण्यासाठी हा बदल आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. बैठकीत महत्त्वाचे निर्णय मंत्रालयात झालेल्या एका आढावा बैठकीत विविध शिष्यवृत्ती योजना … Read more

पशुसंवर्धन विभागात ३११ सहायक आयुक्तांची भरती

पशुसंवर्धन विभागात ३११ सहायक आयुक्तांची भरती; पंकजा मुंडेंचा आणखी एक महत्त्वाचा निर्णय मुंबई, २१ मे: पशुधन विकास अधिकारी पाठोपाठ आता पशुसंवर्धन विभागात सहायक आयुक्त पदाच्या ३११ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी विभागाला अधिक सक्षम करण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या जागांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) जाहिरात प्रसिद्ध केली … Read more

error: Content is protected !!