कागल म्हाडा गृहप्रकल्पाचा प्रश्न आठ दिवसांत मार्गी लागणार: मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर: वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत कागल शहरातील म्हाडा गृहप्रकल्पाबाबतही सविस्तर चर्चा झाली. यावेळी म्हाडा प्रशासनाचे अधिकारी आणि संबंधित सदनिकाधारक उपस्थित होते. या बैठकीत सदनिकाधारकांनी आपल्या समस्या मांडल्यानंतर, मंत्री मुश्रीफ यांनी तात्काळ मुंबई येथील म्हाडाच्या वरिष्ठांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला आणि यावर तातडीने तोडगा काढण्याचे निर्देश दिले. मंत्री मुश्रीफ यांनी सदनिकाधारकांना ग्वाही … Read more

कागल नगरपालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या देयकांबाबत मंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक

राज्यस्तरावर धोरणात्मक निर्णयाची शक्यता कोल्हापूर: वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत आज जिल्हाधिकारी कार्यालयात कागल नगरपरिषदेतील २००३ पासून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या देय रकमेबाबत आढावा बैठक घेण्यात आली. कागल नगरपालिका कर्मचारी संघटनेच्या विनंती अर्जाच्या अनुषंगाने ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला संबंधित नगरपालिका प्रशासनासह जिल्हा नगर प्रशासन अधिकारी आणि संबंधित संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. … Read more

वाचा गहिनीनाथ समाचार अंक ४० ऑनलाईन

गहिनीनाथ समाचार अंक ४० दिनांक १६-०६-२०२५ रौप्यमहोत्सवी गहिनीनाथ समाचार गेली २५ वर्ष अखंडित दर सोमवारी प्रकाशित होत असून गेले २१ वर्ष शासनमान्य जाहिरात यादीवर आहे. देशातील घडामोडी तसेच परिसरातील घटना निर्भीडपणे मांडण्याचा आमचा प्रयत्न असतो. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, राजकारण, अंधश्रद्धा, शेती, युवकांच्या समस्या अशा अनेक प्रश्नावर ‘गहिनीनाथ समाचार’ मध्ये लिहिले जाते. प्रबोधनात्मक अनेक लेखावर चांगल्या … Read more

गारगोटीत क्रांतीचा हुंकार: हुतात्मा स्मारकाच्या विटंबनेने ग्रामस्थ पेटले, बेमुदत आंदोलन सुरू

गारगोटी : ज्या भूमीतून स्वातंत्र्यसंग्रामाचे स्फुल्लिंग चेतले, त्याच कोल्हापूर जिल्ह्यातील गारगोटी गावात आता एका नव्या संघर्षाला तोंड फुटले आहे. देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ उभारलेले स्मारक प्रशासनाने अचानक हटविल्याने गावकरी अक्षरशः पेटून उठले आहेत. या अन्यायाविरोधात गारगोटीच्या मातीने बेमुदत धरणे आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. आज आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी, स्वातंत्र्यासाठी सर्वस्व अर्पण केलेल्या वीरांच्या प्रतिमांना … Read more

पंतप्रधान मोदी यांचे देशांतर्गत समस्यांकडे दुर्लक्ष – संजय राऊत

संजय राऊत यांची पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्यांवरून टीका मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परदेश दौऱ्यांवरून तीव्र शब्दांत टीका केली आहे. पंतप्रधान मोदी वारंवार परदेश दौरे करत असल्याबद्दल राऊत यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, देशांतर्गत महत्त्वाच्या समस्या आणि प्रश्नांकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला आहे. … Read more

अहमदाबाद विमान अपघात: डीएनए चाचणीद्वारे ३२ बळींची ओळख पटली

१४ बळींचे मृतदेह त्यांच्या कुटुंबियांना सोपवण्यात आले आहेत, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. अहमदाबाद : अहमदाबादमध्ये लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान कोसळल्यानंतर तीन दिवसांनी, अधिकाऱ्यांनी आतापर्यंत डीएनए चाचणीद्वारे ३२ बळींची ओळख पटवली आहे आणि रविवारी, १५ जून रोजी. १२ जून रोजी झालेल्या विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या डीएनए जुळवण्याची प्रक्रिया सुरू … Read more

नवीद मुश्रीफ यांचा महत्वपूर्ण निर्णय: गोकुळच्या अध्यक्ष साठी असणारी महागडी गाडी विकणार

कोल्हापूर: वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नवीद मुश्रीफ यांनी गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर एक महत्त्वाचा आणि कौतुकास्पद निर्णय घेतला आहे. अध्यक्षा साठी असलेली महागडी अधिकृत गाडी वापरण्यास त्यांनी नकार दिला असून, ती गाडी निविदा काढून विकण्याचा निर्णय त्यांच्या पहिल्याच मासिक बैठकीत घेण्यात आला आहे. नवीद मुश्रीफ यांनी अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारताच, … Read more

संशोधक विद्यार्थ्यांना दिलासा! सारथीची प्रलंबित शिष्यवृत्ती अखेर खात्यात जमा

कोल्हापूर : सारथी संस्थेच्या संशोधक विद्यार्थ्यांना प्रलंबित असलेली शिष्यवृत्ती आता त्यांच्या बँक खात्यात जमा झाली आहे. यामुळे अनेक विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कोल्हापूर येथील सारथी उपकेंद्राला 12 जून 2025 रोजी शासनाकडून 2024-25 या आर्थिक वर्षासाठी मंजूर झालेला निधी प्राप्त झाला असून, त्यामधून 203 विद्यार्थ्यांना एकूण ₹4 कोटी 13 लाख 47 हजार 144 रुपयांचे वितरण … Read more

अहमदाबादमध्ये भीषण विमान अपघात; २३० हून अधिक प्रवाशांचा मृत्यू

एअर इंडियाच्या विमान दुर्घटनेचा घटनाक्रम अहमदाबाद : अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनच्या गॅटविकसाठी उड्डाण केल्यानंतर काही मिनिटांतच एअर इंडियाचे बोइंग ७८७ ड्रीमलाइनर विमान आज सकाळी भीषण अपघाताला बळी पडले. या दुर्घटनेत २३० हून अधिक प्रवासी आणि १२ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. १९८८ च्या भीषण अहमदाबाद विमान अपघाताच्या आठवणी ताज्या … Read more

मुरगूडमध्ये प्रवीणसिंह पाटील यांच्या बैलाने तोडली कर्नाटकी बेंदूर सणाची ‘कर’!

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड तालुका कागल येथे कर्नाटकी बेंदूर सणानिमित्त सालाबाद प्रमाणे यावर्षी सुद्धा कर तोडण्याचा कार्यक्रम उत्साही वातावरणामध्ये संपन्न झाला. मुरगूड चे माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांच्या बैलाने यावर्षी सदर कर भर पावसात तोडली. कर तोडण्याचा कार्यक्रम पाहण्यासाठी हजारो नागरिक उपस्थित होते. दिग्विजय पाटील, सत्यजित पाटील यांच्या समवेत पाटील कुटुंबीयातील सर्व … Read more

error: Content is protected !!