पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या  पुण्यतिथीनिमित्य अभिवादन

मुरगूड ( शशी दरेकर ):

आनंदी शिक्षण प्रसारक मंडळ कळंबे तर्फ कळे संचलित , गगनबावडा येथील पद्मश्री डॉ. ग. गो.  जाधव महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १३५ व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. प्रथम मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी प्रा. डॉ .नामदेव मोळे यांनी महात्मा फुलेंच्या शेतकऱ्याचा आसूड, सार्वजनिक सत्यधर्म, गुलामगिरी, अशा लेखन साहित्य विषयी सविस्तर माहिती दिली.

Advertisements


अध्यक्षपदावरून बोलताना प्राचार्य डॉ .टी. एम.पाटील म्हणाले की, सामाजिक गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी शिक्षण हे महत्त्वाचे साधन आहे याची जाणीव समाजाला महात्मा फुलेंनी करून दिली. समाजातील अनिष्ट प्रथा आणि परंपरा यांचे समूळ उच्चाटन होण्यासाठी  आणि समाज जागृती साठी त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. महात्मा फुले, सामाजिक क्रांतीचे प्रणेते होते. त्यांचे शैक्षणिक तत्त्वज्ञान आणि सामाजिक  क्रांतीवादआजही समाजाला प्रगतीची प्रेरणा देतो.

या कार्यक्रमासाठी संस्था अध्यक्ष प्रा. सतीश देसाई व सचिव प्रा. डॉ. विद्या देसाई यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा. आदिनाथ कांबळे यांनी केले. सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक प्रा. वंदना इंगवले यांनी केले तर आभार उप प्राचार्य डॉ.संदीप पानारी यांनी  मानले. यावेळी प्रा.देवयानी पारगावकर, प्रा. सुप्रिया घाटगे, प्रा. सौरभ देसाई,रवीना कांबळे,  सचिन बावडेकर, सिद्धार्थ कांबळे, अभिषेक पाटील आदी उपस्थित होते.

Advertisements

Leave a Comment

error: Content is protected !!