कोल्हापूर, दि. 26 (जिमाका) : कृषी विभागातील कृषी आयुक्तालयाच्या अधिनस्त विभागीय कृषी सहसंचालक, कोल्हापूर विभाग कार्यालयाच्या आस्थापनेवरील गट-क -कृषीसेवक संवर्गातील 250 पदांसाठीची जाहिरात दि. 11 ऑगस्ट 2023 रोजी कृषी विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

कृषीसेवक पदभरती संदर्भातील ऑनलाईन परीक्षा आय.बी.पी.एस. कंपनी मार्फत दि. 16 व 19 जानेवारी 2024 रोजी घेण्यात येणार आहे. परीक्षेसाठीचे प्रवेशपत्र यथावकाश आय.बी.पी.एस. संस्थेकडून संबंधितास उपलब्ध करुन देण्यात येईल, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक बसवराज बिराजदार यांनी केले आहे.
Advertisements

Thank you for your sharing. I am worried that I lack creative ideas. It is your article that makes me full of hope. Thank you. But, I have a question, can you help me?