कागल येथे अपघातात एक व्यक्ती ठार

कागल (विक्रांत कोरे) : कागल येथे झालेल्या अपघातात 52 वर्षीय इसमाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास, राज्य महामार्गावर कागल एसटी आगारा समोरच्या वळणावर घडला.

Advertisements

    सुभाष सहदेव कांबळे राहणार मुळगाव शिवडाव ,तालुका- भुदरगड .सध्या राहणार -गारगोटी असे मयत इसमाचे नाव आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार मयत सुभाष कांबळे हा कोल्हापुर येथे आपले मार्केटिंगचे काम आटोपून एम एच- 09- ई बी- 3387 या दुचाकी वरून कागल कडे येत होता. कागल एसटी आगारा समोरच्या  वळणावर आल्यानंतर, आयशर ट्रक क्रमांक जी जे- 12 -बी एक्स -9225 हा भरधाव वेगाने कोल्हापूर कडून कागलच्या दिशेने येत होता. दरम्यान दुचाकीवरून डाव्या बाजूने समोरून जात असलेल्या सुभाष कांबळे यास ओव्हरटेक करत असताना पाठीमागून  ठोकरल्याने तो जागीच ठार झाला .

Advertisements

          राज्य महामार्ग पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रदीप जाधव ,कागल पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल विजय पाटील, हेड कॉन्स्टेबल रणजीत कांबळे व त्यांच्या सहकार्यानी घटनास्थळी धाव घेतली. मृत देहाचा पंचनामा केला.कागल ग्रामीण रुग्णालय येथे शिवछेदन केले व मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला .

Advertisements

    मयत सुभाष यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे .अपघाताची नोंद कागल पोलीस ठाण्यात झालीआहे. पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांच्या मार्ग दर्शनाखाली सहायक फौजदार कोचरगी हे पुढील तपास करीत आहेत.

AD1

Leave a Comment

error: Content is protected !!