कोल्हापूर (जिमाका) : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय यांच्या अखत्यारित असलेल्या महासैनिक दरबार हॉल व लॉन करिता तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी पध्दतीने अशासकीय पहारेकरी पद भरण्यात येणार असून इच्छुकांनी आपले अर्ज दि. 8 डिसेंबर पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे जमा करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कर्नल (निवृत्त) राहुल माने यांनी केले आहे.
अशासकीय पहारेकरी हे पद कंत्राटी पध्दतीने व अल्पशा मानधनावर आहे. माजी सैनिकांना प्रथम प्राधान्य देण्यात येत आहे. तसेच इतर अटी, शर्ती व सविस्तर माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, कोल्हापूर दूरध्वनी क्र. 0231-2665812 वर संपर्क साधावा.