मुख्य बाजारपेठेसह शहरातील मुख्य रस्त्यावरून निघाली पदयात्रा
कागल, दि. ५ : लोकसभा निवडणुकीतील महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ कागलमध्ये पदयात्रा निघाली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने या पदयात्रेत सामील झाले.
सुरुवातीला बसस्थानक परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला व नगरपालिकेच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून पदयात्रेला सुरुवात झाली. त्यानंतर शहरातील मुख्य बाजारपेठेतून कोष्टी गल्ली व मुख्य रस्त्यांवरून गैबी चौकात या पदयात्रेची सांगता झाली.
या पदयात्रेमध्ये केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्याबाबा माने, गोकुळ दूध संघाचे संचालक नवीद मुश्रीफ, ॲड. विरेंद्र मंडलिक, माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर, अतुल जोशी, हमिदवाडा कारखान्याचे संचालक महेश घाडगे, माजी संचालक ईगल प्रभावळकर, माजी उपनगराध्यक्ष प्रवीण काळबर, विवेक लोटे, बाबासो नाईक, शहराध्यक्ष संजय चितारी, माजी नगराध्यक्ष अजित कांबळे, जेष्ठ नगरसेवक चंद्रकांत गवळी, नवल बोते, माजी उपनगराध्यक्ष सुनील माळी, सुनील माने, इरफान मुजावर, तात्यासाहेब पाटील, संजय ठाणेकर, विष्णू कुंभार, अस्लम मुजावर, गंगाराम शेवडे, अर्जून नाईक, पंकज खलीफ, शाणूर पखाली, बच्चन कांबळे, सागर दावणे आदी प्रमुखांसह पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
Your point of view caught my eye and was very interesting. Thanks. I have a question for you.