पुणे टपाल क्षेत्रात ‘राष्ट्रीय टपाल सप्ताह’ उत्साहात; आधुनिक तंत्रज्ञान आणि ‘लोकाभिमुख’ सेवांवर भर

पुणे (प्रतिनिधी): भारतीय डाक विभागाकडून (India Post) ६ ऑक्टोबर २०२५ ते १० ऑक्टोबर २०२५ या दरम्यान ‘राष्ट्रीय टपाल सप्ताह’ उत्साहात साजरा करण्यात येत आहे. टपाल विभागाचे सामाजिक, आर्थिक आणि डिजिटल क्षेत्रातील योगदान लोकांपर्यंत पोहोचवणे हा या सप्ताहाचा मुख्य उद्देश आहे.

Advertisements

दरवर्षी ९ ऑक्टोबर रोजी ‘युनिव्हर्सल पोस्टल युनियन’ (UPU) च्या स्थापनेच्या वर्धापन दिनानिमित्त ‘जागतिक टपाल दिन’ (World Post Day) साजरा केला जातो. या वर्षीचा राष्ट्रीय टपाल सप्ताह हा भारताच्या सामाजिक आणि आर्थिक विकासात टपाल विभागाच्या उदयोन्मुख भूमिकेनुसार आयोजित करण्यात आला आहे.

Advertisements

सप्ताहातील महत्वाचे दिवस आणि उपक्रम:

राष्ट्रीय टपाल सप्ताहात प्रत्येक दिवशी टपाल विभागाच्या विविध सेवांवर लक्ष केंद्रित करून उपक्रम राबवले जात आहेत:
* ६ ऑक्टोबर: तंत्रज्ञान दिवस (Technology Day)
* ७ ऑक्टोबर: वित्तीय समावेशन दिवस (Financial Inclusion Day)
* ८ ऑक्टोबर: फिलॅटेली आणि नागरिक केंद्रित सेवा दिवस (Philately & Citizen Centric Services Day)
* ९ ऑक्टोबर: जागतिक टपाल दिवस (World Post Day)
* १० ऑक्टोबर: ग्राहक दिवस (Customer Day)
टपाल खात्याचा ‘डिजिटल अवतार’

Advertisements

पारंपरिक पत्रव्यवहाराबरोबरच, टपाल खाते आता ‘डिजिटल सेवा केंद्र’ बनले आहे. पुणे येथील ‘पार्सल पॅकिंग युनिट’ (Parcel Packing Unit) आणि ‘डाक निर्यात केंद्र’ (Dak Niryat Kendra) मुळे परदेशात स्पीड पोस्ट द्वारे पार्सल पाठवणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB) आणि AePS सुविधा:

तळागाळापर्यंत, जिथे बँकिंग सेवा उपलब्ध नाही, अशा ठिकाणी आधार आधारित पेमेंट सिस्टीम (AePS) द्वारे पैसे काढण्याची सुविधा केवळ भारतीय टपाल खात्यामार्फत राबविली जाते. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत आजपर्यंत सुमारे ३४ लाख बँक खाती उघडली गेली आहेत.

याव्यतिरिक्त, टपाल विभाग नामांकित विमा कंपन्यांसोबत (उदा. बजाज, टाटा, बिर्ला) टाय-अप करून सामान्य नागरिकांना घरपोच विमा, वाहन कर्ज, गृह कर्ज, बालकांचे आधार कार्ड काढणे, तसेच आधारशी मोबाईल नंबर संलग्न करणे अशा विविध सेवा प्रदान करत आहे.

सामाजिक उपक्रम:
सामाजिक जबाबदारी पार पाडण्यासाठी टपाल विभागाने “एक पेड माँ के नाम” या संकल्पनेतून वृक्षारोपण आणि “व्होकल फॉर लोकल” ला प्रोत्साहन देण्यासाठी पोस्टॅथॉन वॉकिंग इव्हेंट (Postathon walking event) सारख्या नाविन्यपूर्ण योजनांचाही पुढाकार घेतला आहे. तसेच, विभागाला अधिक लोकाभिमुख करण्यासाठी ‘डाक चौपाल’ (Dak Community Development Program) आयोजित केले जात आहेत.

AD1

Leave a Comment

error: Content is protected !!