मुरगूड ( शशी दरेकर ) : अवचितवाडी ( ता. कागल ) येथे स्वराज्य महोत्सव २०२२मध्ये विविध स्पर्धा आयोजित केल्या होत्या . यामध्ये . सिनेअभिनेते मदन पलंगे यांच्या खेळ खेळुया मानाच्या पैठणीचा कार्यक्रम महिलांच्या तोबा गर्दीत घेण्यात आला.
होम मिनिस्टर स्पर्धेत प्रथम क्रमांकाच्या मानाच्या पैठणीच्या मानकरी नंदा गायकवाड ठरल्या. तर दुसरा -अंजना शिंदे , तिसरा -तृप्ती भारमल यांनी पटकावला.
या स्वराज्य महोत्सव 2022 चा सांगता समारंभ युवाशक्तीचे अध्यक्ष पृथ्वीराज धनंजय महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.यावेळी महा-महिला बचतगट निधी लि,च्या चेअरमन सौ.निवेदिता येडूरे,मनसे राज्य उपाध्यक्ष युवराज येडुरे, कागल तालुका राष्ट्रवादी सोशल मिडीया सेलचे अध्यक्ष विशाल कुंभार, भागीरथी महिला संस्थेच्या कागल तालुकाध्यक्ष शुभांगी देसाई ,सरपंच परिषद कागल तालुकाध्यक्ष राजश्री पाटील,आनंदधाम सामाजिक संस्था अध्यक्ष संदिप सरदेसाई यांच्यासह सरपंच , उपसरपंच ,व सदस्य उपस्थित होते.
इतर निकाल पुढीलप्रमाणे -डोक्यावर घागर घेऊन पळणे १ ) सौ . मनिषा भाईंगडे , २ ) सौ . सुवर्णा मांगले , ३ ) सौ . सारीका आंगज.
जिल्हास्तरीय रेकार्ड डान्स स्पर्धा -१ ) कन्विक निकम कोल्हापूर , २ ) नटराज ग्रुप राधानगरी , ३ ) विनय पाटील .
महिला ग्रुप रस्सीखेच स्पर्धा -१ ) त्रिमूर्ती महिला गट२ ) जिजामाता महिला गट , ३ ) ताराराणी महिला गट .
संगीत खुर्ची -१ ) सरिता साळोखे , २ ) प्रतिक्षा बोटे , ३ ) नितांत गायकवाड.
या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आनंद गायकवाड , प्रतिक बोटे , साताप्पा पाटील, स्वप्निल गायकवाड, ओमकार बोटे ,सुरज कांबळे, वैभव आंगज , दिगंबर गायकवाड , विराज बोटे , वेदांत बोटे ,यानीं परिश्रम घेतले .
स्वराज्य महोत्सव चे स्वागत व प्रास्ताविक स्वराज्य निर्माणचे संस्थापक संदिप बोटे यांनी केले . तर सुत्रसंचलन विकास सावंत यानी केले.आभार कृष्णात कापसे यांनी मानले .