मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड ता . कागल येथे ” स्पीड न्यूज २४ चॅनेलचा ” आदर्श शिक्षक ” पुरस्कार प्राप्त झालेले मा . श्री . नामदेवराव शिवाजी घोलप (शिवाजी हायस्कूल महागांव ) यांचा यथोचित सत्कार मुरगूडच्या नव महाराष्ट्र क्रिडामंडळ व मित्रपरिवारातर्फे नुकताच पार पडला.
शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या समाजमान्य गुरुजनांचा आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार ‘ मिळाल्याने ज्ञानदानासारख्या पवित्र क्षेत्राबद्द्लचा पुरस्कार स्पीड २४ चॅनेलने दिल्याबद्दल अत्यांनंद होत आहे असे सत्काराला उत्तर देतानां त्यानीं आपल्या भावना व्यक्त केल्या.
इथून पुढेही ज्ञानदानाचे पावित्र कार्य करीत राहीन असे ते म्हणाले. या सत्कार प्रसंगी मुरगूडच्या श्री. व्यापारी नागरी सह. पतसंस्थेचे चेअरमन श्री . किरण गवाणकर, पत्रकार श्री. शशी दरेकर , श्री. संदीप कांबळे , श्री. अमोल मेटकर, श्री . सनी गवाणकर, श्री. दत्तात्रय कांबळे, नवमहाराष्ट्र क्रिडा मंडळाचे सर्व सदस्य व मित्रपरिवार उपस्थित होता.