मुरगूड नगरपरिषदमध्ये ” नमस्ते दिन ” उत्साहात साजरा

मुरगूड ( शशी दरेकर ) : स्वच्छ भारत नागरी अभियान २.० अंतर्गत नॅशनल अॅक्शन फॉर मेकॅनाइज्ड गॅनिटेशन इकोसिस्टीम योजनेच्या अनुषंगाने १६ जुलैला “नमस्ते दिन” साजरा केला जातो. या दिनानिमित्त सफाई कर्मचा-यांची सुरक्षा व प्रतिष्ठा सुनिश्चित केली जाते. मुरगूड मुख्याधिकारी अतिश वाळूंज यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी नमस्ते दिन साजरा करण्यात आला.

Advertisements

यावेळी नगरपालिकेच्या सफाई कर्मचा-यांना सुरक्षेच्या उपकरणांचे महत्व सांगण्यात आले. ड्रेनेज, सेप्टिक टँकची स्वच्छता करणाऱ्या कर्मचा-यांना आरोग्याची काळजी आणि त्यांच्यासाठी असलेल्या योजनांची माहिती देण्यात आली.

Advertisements

उत्कृष्ट निवड झालेले सफाईमित्र श्री. अक्षय कांबळे व अजित कांबळे यांचा सन्मान करून गौरवण्यात आले. या वेळी मुरगूड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री. अतिश दा. वाळुंज कार्यालय अधिक्षक स्नेहल नरके, आरोग्य विभाग प्रमुख सचिन भोसले, शहर समन्वयक विपुल अपराध, मुकादम बबन बारदेस्कर, भिकाजी कांबळे. व सर्व सफाई कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते.

Advertisements
AD1

Leave a Comment

error: Content is protected !!