मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगुड ता.कागल येथील सर्वांच्या परिचयाची ” श्री व्यापारी नागरी सहकारी पतसंस्था ” मर्या.मुरगुड या पतसंस्थेला नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाॅऊडेंशन बेळगाव या सामाजिक संस्थेकडुन राष्ट्रीय ‘आदर्श सहकारी पतसंस्था’ हा राष्ट्रीय _पुरस्कार प्राप्त झाला.हा पुरस्कार वितरण सोहळा 26 मार्च 2023 रोजी श्री . लक्ष्मीकांत पार्सेकर ( माजी मुख्यमंत्री गोवा ) हरमल पंचक्रोशी शिक्षण मंडळ . गणपत पार्सेकर कॉलेज ऑफ एज्यूकेशन -गोवा येथे संपन्न झाला.या सामाजिक संस्थेकडुन दिल्ली,कर्नाटक,गुजरात,महाराष्ट्र, गोवा राज्यातील निवडक व्यक्तींना किंवा संस्थांना पुरस्कार दिले जातात.त्यापैकी दिला जाणारा ‘ राष्ट्रीय आदर्श संस्था पुरस्कार’ व्यापारी नागरी पतसंस्थेला दिला असल्याची माहीती संस्थेचे सभापती किरण गवाणकर यांनी दिली.
हा पुरस्कार माजी केंद्रीय मंत्री रत्नमाला सावनुर यांच्या शुभहस्ते संस्थेचे चेअरमन किरण गवाणकर यांच्याकडे संस्थेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रदान केला.श्री व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेने सामाजिक , शैक्षणिक, शासकीय, निमशासकीय क्षेत्रात उल्लेखनीय व अतुलनीय असे काम केले आहे. त्यांनी केलेल्या या वैशिष्ट्यपूर्ण विधायक आणि कौतुकास्पद कार्याची दखल घेऊन ‘आदर्श सहकारी संस्था’ हा गौरव पुरस्कार देऊन संस्थेस सन्मानित केले आहे .या पुरस्कारामुळे आपल्याला प्रेरणा व प्रोत्साहन मिळणार असून भावी आयुष्यात संस्थेकडून सर्वागिण विकासाचे मौलिक कार्य घडो या आशयाचे सन्मानपत्र,चंदनाचा हार व सन्मानचिन्ह देऊन संस्थेस सन्मानित केले आहे.
हा पुरस्कार मिळालेनंतर संस्थेचे पदाधिकारी व कर्मचारी वर्गाने साखर-पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.संस्थेचे सभासद,ठेवीदार,हितचिंतक,जिल्ह्यातील विविध सहकारी संस्था,अनेक संस्थेच्या पदाधिकाऱ्यानी व नागरीकानी अभिनंदनाचा वर्षाव केला.या पुरस्काराने श्री व्यापारी नागरी सह.पतसंस्थेच्या गौरवशाली परंपरेने आणखिन भर पडल्याची भावना सभासद व ठेवीदार वर्गातून व्यक्त होत आहे.
हा पुरस्कार स्वीकारताना श्री.व्यापारी नागरी सह.पतसंस्थेचे चेअरमन किरण गवाणकर,संचालक साताप्पा पाटील,किशोर पोतदार,नामदेवराव पाटील, शशिकांत दरेकर,प्रदिप वेसणेकर,प्रकाश सणगर,संदीप कांबळे,महादेव तांबट,सुरेश जाधव व कार्यकारी संचालक सुदर्शन हंडेकर उपस्थित होते.