मुरगूड (शशी दरेकर): शिवाजी विद्यापीठ अंतर्गत, कोल्हापूर विभागीय कुस्ती स्पर्धेत मूरगूडच्या “सदाशिवराव मंडलिक ” महाविद्यालयाच्या मल्लांनी अकरा गुण मिळवून ग्रीकोरोमसन कुस्ती प्रकारात विजेतेपद पटकाविले. या यशाचे मानकरी खालील प्रमाणे 🙁 ग्रीकोरोमन) १) विजय डोईफोडे – ७७ किलो खाली – प्रथम २) रोहित पाटोळे – ५५ किलो खाली – द्वितीय. ३) मयूर सोनाले ८७ खाली – द्वितीय.
तर (फ्री स्टाईल) कुस्ती स्पर्धेत :- १)विनायक वास्कर – ७० किलो खाली – तृतीय. २) ओंकार काशिद – ७९ किलो खाली तृतीय. या सर्वच मल्लांची निवड अंतर विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी झालेली आहे.
या मल्लांना डॉ. शिवाजी पोवार यांचे मार्गदर्शन लाभले. तर संस्था सचिव खासदार प्राध्यापक संजय मंडलिक, अॅड. विरेंद्र मंडलिक, अण्णासो थोरवत, प्राचार्य डॉ. अर्जुन कुंभार यांचे प्रोत्साहन मिळाले. या मल्लांचा सत्कार महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. टी. एम. पाटील यांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन करण्यात आला. यावेळी डॉ शिवाजी पोवार क्रीडा संचालक, दिलीप कांबळे,सर्व प्राध्यापक उपस्थित होते.