राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धसाठी निवड
मुरगूड (शशी दरेकर) : औरंगाबाद येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोशिएशनच्या सब-ज्युनियर, ज्युनियर , सिनियर व मास्टर्स I ते IV (पुरुष व महिला) बेंचप्रेस (इक्विण्ड अण्ड अनइक्विण्ड) अजिंक्यपद स्पर्धत येथील जान्हवी जगदीश सावर्डेकर हिने तब्बल ४ सुवर्णपदके पटकावली आहेत. तिची गोवा येथे होणाऱ्या राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धसाठी निवड झाली आहे.
महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोशिएशन महाराष्ट्र राज्य सब-ज्युनियर, ज्युनियर, सिनियर व मास्टर्स I ते IV (पुरुष व महिला) बेंचप्रेस (इक्विण्ड अण्ड अनइक्विण्ड) अजिंक्यपद स्पर्धा औरंगाबाद येथे ९ व १० ऑक्टोंम्बर २०२१ रोजी झाली. त्यामध्ये जान्हवी सावर्डेकर हिने ७६ किलो वजनी गटात इन इक्युब प्रकारात ७५ किलो वजन उचलुन सिनियर व ज्युनियर गटात दोन सुवर्णपदके तर इक्यूब प्रकारात १०५ किलो वजन उचलुन सिनियर व ज्युनियर गटात दोन सुवर्णपदके अशी चार सुवर्णपदके पटकावली असून तिची राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धसाठी निवड झाली आहे.
जान्हवी सावर्डेकर हिने यापुर्वी महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धत ज्युनियर गटात गोल्ड मेडल तर सिनीयर गटात सिल्व्हर मेडल पटकावले . तसेच अखिल भारतीय आंतरविद्यापीठ पॉवरलिफ्टींग अजिक्यपद स्पर्धत ७९ किलो वजन गटात रौप्यपदकासह राष्ट्रीय व राज्य स्पर्धत ७ सुवर्ण, ५ रोप्य व २ कांस्यपदके पटकावली आहेत .तिला प्रशिक्षक विजय कांबळे यांचे मार्गदर्शन तर वडील जगदीश सावर्डेकर यांचे प्रोत्साहन लाभले.