मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूडमध्ये सालाबादप्रमाणे हजरत गैबी पीर ऊरुस बुधवार दि .११ जानेवारी ते १५ जानेवारी २०२३ अखेर मोठया उत्साहाच्या वातावरणात साजरा होत असून त्या निमित्य विविध कार्यक्रमांचे आयोजन मुरगूड येथिल गैबीपीर ऊरुस समितीने केले आहे.
बुधवार दि .११ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता संदल मिरवणूक व रात्री ९ वाजता सुतार बंधू यांचा ” ऑर्केट्रा झंकार बिट्स ” गुरुवार दि .१२ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता ऊरुस समितीतर्फे गलफ व नैवेध अर्पण कार्यक्रम आणि शनिवार दि .१४ जानेवारी रोजी रात्री ९ वाजता सुभाष हिलगे प्रेझेंन्ट्स ” ऑर्केस्ट्रा वैभव डान्स म्यूझिकल नाईट ” अशा भरगच्च कार्यक्रमांचे नियोजन केले आहे.
बच्चेकंपनीसाठी पर्वणी असलेले सलांम्बो, ट्रॅगन ट्रेन, ब्रेक डान्स, आकाशी पाळणे, मिकी माऊस, जंपींग -जंपांग, ऑक्टोपस तसेच एस्सेलवर्डमधील अनेक करमणुकीची साधने व खाद्यपदार्थांचे अनेक स्टॉल , खेळणी स्टॉल, विविध वस्तूंचे स्टॉल यामुळे गैबी पीर ऊरुस मोठया उत्साहाच्या वातावरणात व भक्तीभावाने साजरा होणार आहे.