मुरगूड ( शशी दरेकर ) – मुरगूड तालुका कागल येथील “व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेचे ” समाज उपयोगी कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे .गरीब गरजू गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देऊन खऱ्या अर्थाने त्यांच्या शैक्षणिक वाटचालीत हातभार लावला. पतसंस्थेच्या वतीने राबवले जाणारे अनेक उपक्रम हे इतर संस्थांच्या समोर आदर्श ठरणारे आहेत असे प्रतिपादन मुरगूड विद्यालय जुनियर कॉलेज मुरगूड चे मुख्याध्यापक एस पी पाटील यांनी केले.
श्री. व्यापारी नागरी पतसंस्थेच्या वतीने संस्थेच्या रोप्य महोत्सवी वर्षानिमित्त विद्यालयातील शेकडो विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वितरण प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन किरण गवाणकर होते.
प्रारंभी स्वागत उप मुख्याध्यापक एस बी सूर्यवंशी यांनी केले यावेळी संस्थेचे चेअरमन किरण गवाणकर व संचालक किशोर पोतदार, यांची भाषणे झाली. कार्यक्रमास संस्थेचे व्हा . चेअरमन प्रकाश सणगर,संचालक सर्वश्री प्रशांत शहा, साताप्पा पाटील , शशिकांत दरेकर , हाजी धोंडीबा मकानदार , नामदेवराव पाटील , प्रदिप वेसणेकर , निवास कदम , संदिप कांबळे ,
मॅनेजर सुदर्शन हुंडेकर, यांच्यासह पर्यवेक्षक एस डी साठे,पी बी लोकरे, अमित भोई ,अशोक चंदनशिवे, वाय ई देशमुख, अमित भोई, समीर कटके आदी मान्यवर उपस्थित होते . सूत्रसंचालन अनिल पाटील यांनी तर आभार मारुती टिपुगडे यानीं मानले.