मुरगूड ( शशी दरेकर )
सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय मुरगूड येथे दि. १३ डिसेंबर २०२५ रोजी एनसीसी विभागामार्फत घेण्यात आलेल्या पालक मेळावा प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी होडगे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात पालकांना मार्गदर्शन केले.
सध्याच्या स्पर्धात्मक युगात पालकांचा आधार विद्यार्थ्यांना आत्मविश्वासू बनवतो. प्रसार माध्यमांच्या मोहजाळात अडकण्यापासून फक्त पालकांची सजगताच त्यांचे भवितव्य सावरू शकते असे ते म्हणाले. याप्रसंगी स्वागत व प्रास्ताविक लेफ्टनंट प्रा. विनोदकुमार प्रधान यांनी केले. एनसीसीचे विद्यार्थ्यांच्या आयुष्यात आणि भवितव्य घडविण्यातील महत्त्व सांगितले. पालकांनी सजगपणे आपल्या मुलांना त्यांची स्वप्ने साकार करण्यासाठी आधार द्यावा, असे आवाहन केले.
यानंतर मान्यवरांच्या हस्ते सर्व माता आणि पिता पालकांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. तसेच, १५ मराठा लाईट इनफॅन्ट्री (बुर्ज) पुणे येथे झालेल्या इंटर बटालियन ड्रिल कॉम्पिटेशन मध्ये ५ महाराष्ट्र बटालियनने तृतीय क्रमांक पटकावला आणि कंटिजन्ट कमांडर म्हणून महाविद्यालयाचा कॅडेट करण सुतार याने यामध्ये ५ महाराष्ट्र बटालियन चे नेतृत्व केले त्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्याचा व कॅडेट आदित्य लोहार याचा सत्कार करण्यात आला.
त्यानंतर कॅडेट करण सुतार, कॅडेट तनुजा सुतार, कॅडेट पूजा राऊत, एस यू ओ सुशांत मसवेकर यांनी आपल्या मनोगतातून पालकांशी संवाद साधला.स्टाफ सेक्रेटरी प्रा . दादासाहेब सरदेसाई यांनी पालकांना महाविद्यालयाच्या विविध उपक्रमांची व यशस्वी विद्यार्थ्यांची माहिती दिली. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. शिवाजी पोवार यांनी पालकांना विद्यार्थ्यांना अतिरिक्त न जपता थोडी मोकळीक द्यावी असे सांगितले. पालक श्री. कुबेर निलजकर यांनी महाविद्यालयात होणाऱ्या उपक्रमांचे कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन जेयूओ आदित्य तहसीलदार यांनी केले. तर सूत्रसंचालन सीक्यूएमएस प्रतीक्षा परीट आणि आदित्य तहसीलदार यांनी केले.
याप्रसंगी महाविद्यालयाचा सर्व प्राध्यापक वृंद, प्रशासकीय कर्मचारी, चतुर्थ श्रेणी कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थीनी, प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाचे सर्व कॅडेट्स उपस्थित होते. त्याचबरोबर श्री.दत्तात्रय तहसिलदार, श्री.कुबेर निलजकर, श्री.कृष्णात रेपे, श्री.अरविंद राऊत, श्री.संजय सुतार, श्री. सर्जेराव खामकर, श्री. साताप्पा लोहार, श्री.पांडुरंग सुतार, श्री.सुधीर गुरव, श्री.समाधान वरपे हे सर्व पालक आणि माता सौ.सुशिला हंचनाळे, सौ. सविता भराडे व सौ.रुपाली चोपडे हे सर्व उपस्थित होते.
