७ आणि ८ नोव्हेंबर वर्धा येथे होणार स्पर्धा

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता . कागल येथील मुरगूड विद्यालय ज्युनि कॉलेज चा विद्यार्थी वरद सुनील घाटगे याची शासकीय राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी चौदा वर्षे वयोगटाखाली संघात निवड झाली आहे. कुडाळ सिंधुदुर्ग येथे झालेल्या निवड चाचणीतुन ही निवड करण्यात आली आहे.वर्धा येथे सात आणि आठ नोव्हेंबर ला या स्पर्धा होणार आहेत.

Advertisements

कागल तालुक्यातील स्पर्धे मध्ये प्रथम क्रमांक पटकावल्या नंतर मिणचे हातकणंगले येथील जिल्हास्तरीय स्पर्धेत मुरगूड विद्यालयाच्या संघाने उपविजेतेपद पटकावले होते.यावेळी सर्वच सामन्यात वरद ने उत्कृष्ट खेळ केला होता . या खेळाच्या जोरावर त्याची कुडाळ येथील निवड चाचणीसाठी निवड झाली होती . त्या ठिकाणीही त्याने चमकदार कामगिरी केल्याने राज्यस्तरीय स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे.

Advertisements

त्याला शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूरचे सचिव प्रा. जयकुमार देसाई,अध्यक्षा शिवानी देसाई, उपाध्यक्ष शिवाजीराव सावंत,चेअरमन मंजिरी देसाई मोरे,पेट्रन कौन्सिल मेंबर युवा नेते दौलतराव देसाई ,कोजिमाशीचे अध्यक्ष बाळ डेळेकर,प्राचार्य एस. आर. पाटील, उपप्राचार्य एस. पी. पाटील, उपमुख्याध्यापक एस .बी. सुर्यवंशी, पर्यवेक्षक एस. डी. साठे,पी.बी.लोकरे यांचे प्रोत्साहन तर क्रीडा शिक्षक अनिल पाटील, संभाजी कळंत्रे, महादेव खराडे,वडील सुनील घाटगे यांचे मार्गदर्शन लाभले.

Advertisements
AD1

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!