३० वाहनावर कारवाई करीत १५५oo इतका दंड वसूल
मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूडच्या आठवडा बाजार दिवशी रस्त्यावरील बेशिस्त पार्किंगवर मुरगूड पोलीसांनी कडक कारवाई केली. ३० वाहनावर कारवाई करीत १५५oo इतका दंड वसूल केला आहे. पोलीसांनी राबविलेल्या या मोहिमेमुळे गर्दीचा रस्ता मोकळा झाला. त्याबद्दल नागरिकातून समाधान व्यक्त होत आहे .
बाजारच्या दिवशी एस .टी. बसस्थानक परिसर ते जवाहर रोड ते मुरगूड निपाणी या मुख्य रस्त्यापर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांनी रस्ता खचाखच भरत होता . त्यातच रस्त्यावर अनेक ठिकाणी व विशेषतः शिवतीर्थाच्या ठिकाणी दुचाकी वाहने वाटेल तशी लावली जात होती . त्यामुळे या मार्गाने जाणाऱ्या वाहतुकीस मोठा अडथळा होत होता .
या मोहिमेत तहसिलदार अमरदिप वाकडे , सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी करे , वाहतूक पोलीस विक्रम तावडे व राहूल गायकवाड यांच्यासह पोलीस प्रशांत गोजारे ,भैरवनाथ पाटील , राहूल देसाई आदिंनी सहभाग घेतला.