मुरगूड (शशी दरेकर) – मुरगूड नगरपरिषदेला महाराष्ट्रात अव्वल स्थान मिळवून देणार. अशी ग्वाही खासदार प्रा. संजय मंडलिक यांनी दिली. मुरगूड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी , खाते अधिकारी आणि सेवकवृंद यांच्या वतीने नगर परिषदेचा १०१ व्या वर्धापन दिनाचा लोकोत्सव साजरा करण्यात येत आहे. या निमित गुरुवार १ सप्टेबर पासून १६ सप्टेबर अखेर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमातील एक भाग म्हणून नगर परिषदेच्या प्रांगणातील भव्य अश्वारूड छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन व त्यानंतर नगरपिरषदेच्या इमारतीचे पूजन खासदार श्री मंडालिक यांच्या हस्ते केक कापून करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार मंडालिक बोलत होते. एस.डी. एम. फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष युवानेते अॅड. वीरेंद्र मंडलिक प्रमुख उपस्थित होते.
चांगल्याला चांगले म्हणणे हे शसक्त विचाराचे द्योतक असल्याचे सांगुन खासदार श्री.मंडालिक म्हणाले की या नगरीच्या सर्वांगीन विकासामध्ये स्वर्गीय विश्वनाथराव हरीभाऊ पाटील तथा आण्णाजी यांनी मोलाचे योगदान दिले.
त्यानंतर स्वर्गीय खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी विविध जाती धर्माच्या नागरीकांना मुरगूड नगरीचे नगराध्यक्ष करून शाहू, फूले, आंबेडकरांच्या विचाराचा वारसा सत्यात उतरविला. त्यांनी केलेली विकास कामे गौरवास पात्र झाली आहेत.
खासदार प्रा.मंडलिक म्हणाले विकास कामाची मालिका सदैव सुरूच असते. आपण नेहमी मोठ्ठी स्वप्ने पहात असतो. ते सजग विचाराचे द्योतक आहे. तुम्हा साऱ्यांची स्वप्ने सत्यात उत्तरविण्यासाठी या नगरीचा सुपूत्र म्हणून मी कंबर कसून तयार आहे. असेही खा. मंडलिक म्हणाले. मुरगुड हे पूर्वी एक छोट्याशा बाजार पेठेचे गाव. तळकोकणाचे प्रवेशद्वार असलेली बाजारपेठ. पंचक्रोशीतल्या सुमारे पंन्नासहून अधिक खेङ्यासाठी बाजारहाटाच्या दृष्टिनी महत्वाचे मध्यवर्ती ठिकाण. इथली बाजार पेठ म्हणजे मुरगूडच्या वैभवात भर टाकणारी आखीव रेखीव रचनेची बाजारपेठ. सर्वानी एकदिलाने काम करून मुरगूड नगरपरिषद महाराष्ट्रात अव्वल दर्जाची करूया असे आवाहनही खा. मंडलिकांनी यावेळी केले.
सुरूवातीला खासदार श्री. मंडलिक व ऍड. वीरेंद्र मडलिक , अनुक्रमे पिता पुत्राच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे पूजन आणि केक कापून नगर परिषदेच्या इमारतीचे पूजन करण्यात आले. माजी नगराध्यक्ष नामदेवराव मेंडके, पांडूरंग भाट, माजी उपनगराध्यक्ष जयसिंगराव भोसले, माजी नगरसेवक किरण गवाणकर, शिवाजीराव चौगले, बाजीराव गोधडे, सुहास खराडे यांच्यासह सर्व माजी नगरसेवक, यांना खासदार मंडलिकांनी केक भरवून आनंदोत्सव साजरा केला.
खा.श्री.मंडलिक व ऍड. विरेंद्र या पिता- पुत्राचा नगरपरिषदेच्या वतीने शाल, श्रीफळ व मानाचा कोल्हापूरी फेटा बांधुन सत्कार करण्यात आला. या नंत्तर बाजारपेठेतून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. कार्यक्रमासह शोभायात्रेला नागरीकांनी खूपच मोठ्ठी गर्दी केली होती.
लक्षवेधी पेहराव – नगरपरिषदेच्या १०१ व्या वर्धापन दिनाचे सर्व नियोजन नगरपरिषदेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यानी केले होते. डोकीवर तुरा काढलेला फेटा ठिपक्याचा नेहरू शर्ट आणि विजार तर महिलानी दगडी रंगाच्या साड्या परिधान करुन डोक्यावर फेटे बांधले होते. विशिष्ट ड्रेस कोडमधील हे सारेजण कार्यक्रमाच्या यशस्वीतेत मग्न असले तरी सहजा सहजी उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते.