गोकुळ शिरगाव( सलीम शेख): गुरुवार दि.०३ ऑक्टोंबर २०२४ रोजी सौ. आंबुबाई पाटील इंग्लिश मिडियम हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज, गोकुळ शिरगाव येथे डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम सायन्स रिसर्च सेंटरचे उद्घाटन उत्साहात करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजी युनिव्हर्सिटी सायन्स संशोधक संचालक, माननीय प्राध्यापक डॉ. सागर देळेकर सर आणि गोकुळ दूध संघाचे संचालक श्री. प्रकाश पाटील सर उपस्थित होते.
य
ा कार्यक्रमात माननीय संस्थापक श्री. के.डी. पाटील सर, प्रिन्सिपल श्री. तेजस पाटील सर, व्हाईस प्रिन्सिपल सौ. एन. बी. केसरकर मॅडम, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. एस. के. पाटील मॅडम, पुरोगामी पत्रकार संघ महाराष्ट्र उपाध्यक्ष श्री दत्ता पाटील , ग्रामपंचायत सरपंच श्री. चंद्रकांत डावरे सर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री. तेजस पाटील सर यांनी प्रास्ताविक केले. प्रमुख पाहुणे डॉ. देळेकर सर यांनी विद्यार्थ्यांना संशोधनाचे महत्त्व पटवून दिले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांचा उल्लेख करत विद्यार्थ्यांना मन, मनगट आणि मेंदू सक्षम करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. निर्मला केसरकर मॅडम यांनी केले आणि श्री. सरदार पाटील सर यांनी कार्यक्रमाची सांगता केली.
या नव्याने उद्घाटित सायन्स रिसर्च सेंटरमुळे विद्यार्थ्यांना विज्ञान क्षेत्रात संशोधन करण्याची संधी मिळणार आहे.
खूप छान रिसर्च सेंटर आहे सर्वांनी अवश्य भेट द्यावी.