मुरगुड येथील सभेत माजी खासदार राजू शेट्टी यांचा गौप्यस्फोट
मुरगूड ( शशी दरेकर ) – कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना,हसन मुश्रीफ ,खासदार संजय मंडलिक,शाहु चे अध्यक्ष समरजीतसिंह घाटगे यांची ऊस दर देण्याबद्दल गट्टी कशी होते असा गौप्यस्फोट स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला. मुरगुड येथील ऐतिहासिक तुकाराम चौक येथे राजू शेट्टी यांची ऊस आंदोलनसाठी जाहीर सभा झाली. त्यावेळी राजू शेट्टी बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शेतकरी सदाशिव भारमल हे होते.
यावेळी राजू शेट्टीं म्हणाले ऊस दराचे आंदोलन सध्या पेटलेले आहे. मागील वर्षीच्या ऊसासाठी वाढीव चारशे रुपये हप्ता आणि चालू गळीतासाठी हंगामातील प्रतीटन 3500 रू मिळालाच पाहिजे कागल तालुका हे राजकीय विद्यापीठ म्हणून ओळखले जाते . परंतु हे कसले राजकीय विद्यापिठ लाळ घोठे विद्यापिठ आहे. खासदारकी असो आमदार की असो जिल्हा परिषद असो कोणतेही इंलेक्षण असो एकमेकाचे मुडदे पडण्यापर्यंत कार्यकर्ते येथे तयार असतात . प्रामाणिक कार्यकर्ते ह्यात भरडला जातो.
राजु शेट्टी पुढे म्हणाले परंतु तीच ईर्षा तुम्ही तुमच्या कारखान्यावर दर देण्याबद्दल का करत नाही . तिघांची एक गट्टी कशी होते. हेच आम्हाला कळत नाही. ह्यात गौडबंगाल काय. आता आमचे डोके ठिकाणावर आले आहेत. तुमची गट्टी लोक ओळखून आहेत. ज्यांच्या त्यांच्या कारखान्यावर आपल्याच कार्यकर्त्यांचे गळे दाबता लाज वाटली पाहिजे तुम्हाला. पहिला जमाना गेला. विश्वासहर्ता कुठं गेली तेच कळत नाही. दलबदलू पणा दिसत आहे. नांव न घेता तीनही कारखान्यावर राजू शेट्टी यांनी सडकुन टिका केली.
जिल्हा उपाध्यक्ष सागर कोंडेकर,म्हणाले की कागल तालुक्यातील लोकांच्यावर चुकीचे पद्धतीने गुन्हे नोंद करता लाज वाटली पाहिजे या राज्यकर्त्यांना तुमची पोर बीएमडब्लु मधुन फिरणार आणि आमच्या पोरांनी झेंडा घेऊन तुमच्या पाठीमागून फिरायच आणि तुम्ही मात्र एकमेकांना सांभाळून घेण्यासाठी राज्यकर्ते एकत्र येतात येथून पुढं चालू देणार नाही.
कागल तालुका अध्यक्षडॉ.बाळासाहेब पाटील उपाअध्यक्ष नामदेव भराडे, तानाजी मगदुम, महावीर मगदुम,संपत पाटील, शिवाजी कळमकर, परसुराम कदम मतिवडे, मायकल बारदेस्कर, भागवंत शेटके, पांडुरंग आडसुळे वाळवे, जोतिराम सुर्यवंशी, मारुती चौगले आदींनी आपले मनोगत व्यक्त केले
यावेळी संदीप भारमल, आनंदा कदम ,अशोक चौगुले , दत्तात्रय साळोखे, रानोजी गोधडे, सचिन मेंडके, विजय गोधडे, मयुर सावर्डेकर, गजानन मोरबाळे, विजय अडव उपस्थित होते सभेचे स्वागत प्रस्ताविक समाधान हेंदळकर यानी केले. सुत्रसंचालन अनिल पाटील तर आभार बबन बाबर यांनी मानले.