दूध उत्पादकांनी जनावरांना लसीकरण करून घ्यावे : नविद मुश्रीफ यांचे दूध उत्पादकांना आवाहन

मळगे बु. (ता.कागल) : दूध उत्पादकांनी जनावरांना लम्पी प्रतिबंधक लसीकरण करून घ्यावे. असे आवाहन गोकुळ दूध संघाचे संचालक नविद मुश्रीफ यांनी केले. त्यांच्या उपस्थितीत मळगे बुद्रुक तालुका कागल येथे जनावरांना लम्पी प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. नविद मुश्रीफ यांनी कागल तालुक्यातील विविध गावांमध्ये सुरू असलेल्या लसीकरणाचा ठिकाणी भेटी देऊन गोकुळ संघ दूध उत्पादकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचे सांगून दिलासा दिला.

Advertisements

यावेळी श्रीकांत पाटील, रघुनाथ अस्वले, प्रताप पाटील, किशोर पाटील, एकनाथ पाटील, सतीश पाटील, महादेव तांबेकर, तानाजी पाटील, उत्तम पाटील, शिवाजी साळस्कर, संजय पाटील, विनोद गायकवाड, इतर मान्यवरव व ग्रामस्थ उपस्थित होते.

Advertisements
AD1

Leave a Comment

error: Content is protected !!