मुरगूडच्या नवमहाराष्ट्र मंडळातर्फे म्हामद्याचा कार्यक्रम

दोनशे भाविकांना महाप्रसाद वाटप

मुरगूड ( शशी दरेकर ) – मुरगूड-येथील  विविध समाजोपयोगी उपक्रम  राबवणा-या नवमहाराष्ट्र क्रीडा मंडळातर्फे, आषाढी यात्रेनिमित्त विठुरायाच्या भेटीसाठी मार्गस्थ असलेल्या, ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीसोहळ्यात  दिवेघाट ते सासवड पायीचालत श्रद्धाभावपूर्वकपणे सामील  होऊन परतलेल्या नवमहाराष्ट्र क्रिडा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी शहरातील दोनशे भाविक, भक्तांना म्हामद्याचा(महाप्रसाद वाटपाचा) कार्यक्रम केला.

Advertisements

गेली पंधरा वर्षांपासून हा उपक्रम मंडळातर्फे अतिशय पवित्र  व मांगल्यपूर्ण वातावरणात  राबवला जात असून यंदाच्या पायी दिंडीच्या वारीत दिपक वारके, सर्जेराव कुडबे , सुनिल गवाणकर , अनिल मगदूम , राजेंद्र भारमल, संदिप कांबळे , प्रशांत हळदकर , अमोल मेटकर , दिपक बहुधान्ये , अरूण माने , अशोक खैरे , चेतन गवाणकर , रणजित भारमल , संजय वारके, संदिप कलकुटकी , प्रविण भारमल, सागर हळदकर , इत्यादी सभासद पायी वारीत सहभागी झाले होते.

Advertisements

मंडळातर्फे शहराच्या मध्यवर्ती बाजारपेठ येथे या मंडळाच्या प्रयत्नातून भव्य असे आत्मरूप गणेश मंदिर  साकारून या निमित्ताने श्री गणेश जयंती, व मंदिराच्या वर्धापनदिनावेळी विविध  समाजोपयोगी  उपक्रम व मोठया प्रमाणात महाप्रसादाचे वाटप केले जाते . याच बरोबर इतर पण सातत्यपूर्ण उपक्रम राबवले जातात. या नवमहाराष्ट्र क्रिडा मंडळाचे कार्य इतर मंडळानी आत्मसात करण्यासारखे आहे .

Advertisements
AD1

3 thoughts on “मुरगूडच्या नवमहाराष्ट्र मंडळातर्फे म्हामद्याचा कार्यक्रम”

  1. I do believe all the ideas youve presented for your post They are really convincing and will certainly work Nonetheless the posts are too short for novices May just you please lengthen them a little from subsequent time Thanks for the post

    Reply
  2. Thank you I have just been searching for information approximately this topic for a while and yours is the best I have found out so far However what in regards to the bottom line Are you certain concerning the supply

    Reply

Leave a Comment

error: Content is protected !!