कागल (विक्रांत कोरे) : दि कागल एज्युकेशन सोसायटी, कागल संचलित सरलादेवी यशवंतराव माने बाॅईज ॲण्ड गर्ल्स हायस्कूल, कागल. शाळेत एस्. एस्. सी. परीक्षा मार्च- २०२२ या परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
यामध्ये १) कु. श्रावणी महादेव गवळी कागल केंद्रात प्रथम, २) कु. सानिया सुभाष कालेकर कागल केंद्रात द्वितीय, ३) कु. अंजली रविंद्र नलवडे कागल केंद्रात तृतीय, तसेच मराठी माध्यमामध्ये १) कु. स्नेहा विश्वजीत पाटील प्रथम क्रमांक, २) कु. वर्षा संजय निंबाळकर द्वितीय क्रमांक, ३) कु. अस्मिता देवेंद्र बंड तृतीय क्रमांक, कु. दर्शन बाळासो पाटील गणित विषयात प्रथम या विद्यार्थ्यांना रोख रक्कम व पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या श्रीमती मीनाताई घाग (संचालिका, दि कागल एज्युकेशन सोसायटी, कागल) व अध्यक्षा सौ. सुजाता माने (मुख्याध्यापिका, बाॅईज ॲण्ड गर्ल्स हायस्कूल, क. सांगाव) उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सविता माने यांनी केले. सूत्रसंचालन शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका सौ. संध्या नांगनूरकर यांनी केले.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष सुनील माने, अभिनव क्लासचे संचालक उत्तम साखरे, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सविता माने , सौ. भारती कुलकर्णी , शंकर संकपाळ व विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, इयत्ता १०वी चे विद्यार्थी उपस्थित होते.नितीन माळी यांनी आभार मानले.